संघर्षातून वडेट्टीवारांना आजचे यश...

मंत्री विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार

गोंडपिंपरी, जि. चंद्रपूर : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सामान्यांसाठी काम करणारा एक शिवसैनिक ते काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अन् आता राज्याचा कॅबिनेट मंत्री. विजय वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. 

पण, त्यामागे संघर्षाची गाथाही आहे. विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा जन्म करंजी गावात झाला. वडील सरपंच होते. अनेक कडक निर्णय घेत त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला. पण, अचानक त्यांचे निधन झाले. अन् येथूनच विजयरावांचा संघर्ष सुरू झाला. आई कमलाबाई आणि दोन लहान भाऊ यांचाही भार विजयरावांच्या खांद्यावर आला.  

गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. कुटुंबीयांच्या वाट्याला आलेल्या संघर्षमय स्थितीनंतर त्यांनी गाव सोडले आणि गडचिरोलीत गेले. एकीकडे कुटुंबीयांची जबाबदारी, दुसरीकडे शिक्षण अशा दोन्ही भूमिका त्यांनी पार पाडल्या. अशातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जोमाने पक्षाचे काम करीत आहे, ही बाब पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत गेली आणि पक्षाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी विजय वडेट्टीवार यांना संधी दिली आणि त्यांचे नेतृत्व फुलत गेले. यानंतर ते वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. श्री. राणे यांनी नंतर काॅंग्रेस सोडला, पण विजय वडेट्टीवार यांनी एकनिष्ठ राहत काॅंग्रेसमध्ये आपल्या प्रतिभेने पदाचे शिखर गाठले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. पण, या मोठ्या आव्हानाला तोंड देत श्री. वडेट्टीवार यांनी विजयश्री मिळविली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com