Agriculture Agricultural News Prithviraj chavan targets opposition leader on package issue Mumbai Maharashtra | Page 2 ||| Agrowon

प्रत्यक्ष खर्चाचे आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी जाहीर करा : पृथ्वीराज चव्हाण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मे 2020

मुंबई : पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. 

मुंबई : पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. 

याबाबत श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण त्यांनी दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासविण्याचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. याआधी मी सांगितल्याप्रमाणे, विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे (फिस्कल स्टिम्युलस) आहेत आणि उर्वरित पॅकेज हे कर्जाच्या स्वरुपातील (मॉनेटरी स्टिम्युलस) आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये येऊ शकतात. 

रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) ५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देणार आहे आणि ती रक्कम जवळपास १ लाख ६० हजार कोटी आहे असे सांगितले. ही दिशाभूल आहे. आताच्या परिस्थितीत राज्यांना आधीपासून जीएसडीपीच्या ३ टक्के कर्ज घेण्याची परवानगी होतीच, ती आता २ टक्के वाढवून ५ टक्क्यांपर्यंत वाढवली हे खरे आहे, परंतु त्या वाढीव २ टक्क्यांपैकी फक्त ०.५ टक्के रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त १५-१६ हजार कोटी रक्कम तातडीने मिळू शकतील. उर्वरित १.५ टक्के रक्कमेची उचल (सुमारे ४५ हजार कोटी रुपये) करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आलेले आहेत. 

केंद्र सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे विविध घटकांना कर्जरूपाने रक्कम देण्याची तयारी दाखविली आहे, पण त्यामध्ये अनेक शर्ती आहेत. जो त्या अटीशर्ती पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदा: किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का व ते उत्सुक नसतील तर राज्य किंवा केंद्र शासन त्यांना सक्ती करू शकत नाहीत. त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्र सरकारच्यावतीने कर्ज किती व रोख खर्च किती याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी दिली, तर ताबडतोब किती दिलासा मिळाला हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...