कुडाळ येथे वणवामुक्तीची प्रात्यक्षिके

पथनाट्याच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
पथनाट्याच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

कुडाळ, जि. सातारा  ः वन विभागाच्या जावळी वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे वणवे रोखण्यासाठी फायर ब्लॉक प्रात्यक्षिके व प्रतिबंध सप्ताहात जावळी तालुक्‍यात पथनाट्याच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी प्रात्यक्षिके व जनजागृती करण्यात आली.

या वेळी वनविभागाचे अधिकारी शिंदे कर्मचारी व ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे वणवाविरोधी कायदेविषयक माहिती व वणवामुक्त गावासाठी शपथ देण्यात आली. हिवाळा संपल्यानंतर डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. याच धर्तीवर जावळी तालुका वनविभागाने याबाबत मोहीम आखली असून, गावागावांत वणवा समिती व वनसैनिक यांची नियुक्ती करत वणव्यावर करडी नजर ठेवण्यामध्ये भर दिला आहे. जनावरांना ओला व सुका चारा मिळविण्यासाठी वणवा लावण्यात येतो. वणवा लावल्याने चांगले व जास्त गवत येते, हा जाणीवपूर्वक पसरलेला गैरसमज पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या समोर जनजागृती करत मांडला.

डोंगर, जंगलामधला पालापाचोळा जाळल्यामुळे त्याची नैसर्गिक सेंद्रिय खताद्वारे असणारी उपयुक्त मात्रा नष्ट होते, असेही या निमित्ताने वनविभागाकडून सांगण्यात आले. या वेळी वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे कुडाळ, सरताळे, म्हसवे, सर्जापूर, हुमगाव, आखाडे या परिसरात वणवा जनजागृतीबाबत पथनाट्य सादर करून मार्गदर्शन करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com