Agriculture Agricultural News Radhakrushna vikhe patil targets government on milk rate issue Nagar Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर धडकेल  : राधाकृष्ण विखे पाटील

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नगर ः दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल, असा इशारा माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

नगर  ः महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतिही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा प्रश्न आहे. सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल, असा इशारा माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आमदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहता तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी राहाता येथे नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी विखे यांनी राज्य सरकारवर टिका केली.

ते म्हणाले, की सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. मुख्यमंत्री मुलाखतीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची थट्टा करी आहेत. ‘कोरोना’च्या संकटात शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकार करू शकले. राज्यात युरियाचा काळा बाजार सुरू आहे. सोयाबीन बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली, पण एकाही खासगी कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले नाहीत. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतक-यांना कोणतीही मदत जाहीर केली नाही. राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांकडील दूध १८ ते १९ रुपयांनी खरेदी करून त्यांची फसवणूक केली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...