Agriculture Agricultural News report pending on the Food Corporation of India Pune Maharashtra | Agrowon

भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार समितीचा अहवाल पडून

मनोज कापडे
शनिवार, 4 जुलै 2020

भारतीय अन्न महामंडळ अर्थात ‘एफसीआय’ हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे केंद्र आहे. महामंडळाच्या बळकटीकरणासाठी आम्ही अहवाल दिले. मात्र, पुढे त्याचे काय झाले, याविषयी सांगता येणार नाही. 
- शांता कुमार, अध्यक्ष, केंद्रीय उच्चस्तरीय समिती.
 

पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता तपासून बळकटीकरणाचे उपाय सूचविणारा शांता कुमार समितीचा अहवाल पडून आहे. त्यामुळे महामंडळातील मूलभूत सुधारणा लांबणीवर पडल्या आहेत.  

देशातील शेतकऱ्यांचा ‘एफसीआय’च्या कामकाजाशी अप्रत्यक्षपणे निकटचा संबंध येतो. गहू व तांदळाची किमान आधारभूत भावाने खरेदीची जबाबदारी ‘एफसीआय’कडे आहे. यात ९० टक्के शेतीमालाची खरेदी राज्य यंत्रणा करते. मात्र, देशात साठवण व वितरणाची जबाबदारी ‘एफसीआय’कडे आहे. स्वस्त धान्य वितरणव्यवस्थेसाठी ६० दशलक्ष टनांपेक्षा जास्त धान्य सरकारला हवे असते. त्यात ‘एफसीआय’ मोलाची भूमिका बजावते. केंद्राकडून लोकांना प्रतिकिलो तीन रुपयांत तांदूळ व दोन रुपयांत गहू दिला जातो. सरकारने या खर्चाचा अभ्यास केला. त्यात तांदळासाठी प्रतिकिलो ३० रुपये आणि गव्हावर २२ रुपये खर्च होत असल्याचे आढळले. यामुळे ‘एफसीआय’च्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह लावले गेले आहे.

नियोजन आयोगाने २००५ मध्ये केलेल्या अभ्यासात सार्वजनिक वितरणव्यवस्थेत ५८ टक्के गळती होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढला. ‘‘शांता कुमार अहवालात ही गळती काही राज्यात ७० ते ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे नमूद केले गेले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
 


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...