Agriculture Agricultural News Requested information from District Supply Office for distribution of food grains pune Maharashtra | Agrowon

अन्नधान्य वाटपासाठी पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून माहिती मागविली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

पुणे  : टाळेबंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेअंतर्गत अन्नधान्य वाटप केले. केंद्र सरकारने नुकतीच जाहिर केलेल्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजना राबविताना या योजनेचा आधार घ्यावा लागणार आहे. केंद्राच्या योजनेतून जिल्ह्यात अन्नधान्य वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून शरद भोजन लाभार्थ्यांची माहिती मागविण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

पुणे  : टाळेबंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेने शरद भोजन योजनेअंतर्गत अन्नधान्य वाटप केले. केंद्र सरकारने नुकतीच जाहिर केलेल्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजना राबविताना या योजनेचा आधार घ्यावा लागणार आहे. केंद्राच्या योजनेतून जिल्ह्यात अन्नधान्य वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून शरद भोजन लाभार्थ्यांची माहिती मागविण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढताच देशभरात टाळेबंदीमुळे सुरू झाली. यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात नागरिक अडकून पडले. या काळात कोणीही उपाशी राहून नये यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग व इतर संस्था, संघटनांच्या निधीतून शरद भोजन योजना राबविण्यात आली. चार टप्प्यात राबविण्यात आलेल्या योजनेतून निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला, तृतीयपंथी, विविध कलाकार, रोजगारासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून, राज्यातून आलेले स्थलांतरीत नागरिक यांच्यासाठी अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत जे विस्थापित मजूर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत, त्यांना केंद्र शासनाने मे, जून या दोन महिन्याकरिता धान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विना शिधापत्रिकाधारक सर्व विस्थापित मजुरांना पाच किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेने शिधापत्रिका नसणाऱ्या गरजू कुटुंबियांना शरद भोजन योजनेअंतर्गत धान्य वाटप केले असल्याने योजनेतील तालुकानिहाय कुटुंब संख्या आणि त्यामध्ये समाविष्ट लाभार्थी संख्या जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे. माहिती मिळाल्यावर आत्मनिर्भर भारत योजनेतील धान्य वाटप करणे सोईचे होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...