Sharad Pawar : आघाडीच्या वादात शरद पवारांची मध्यस्थी

मुंबई : मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्‍या, पारनेरमधील पाच शिवसेना नगरसेवकांचा राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, लॉकडाउन यांसह विविध मुद्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हस्तक्षेप केला. श्री. पवार यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांतील तणाव काहीसा निवळल्याचे सांगण्यात आले.
ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

मुंबई : मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्‍या, पारनेरमधील पाच शिवसेना नगरसेवकांचा राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, लॉकडाउन यांसह विविध मुद्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हस्तक्षेप केला. श्री. पवार यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांतील तणाव काहीसा निवळल्याचे सांगण्यात आले.

आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये  गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन चर्चा केली. सरकार म्हणून भविष्‍यात महत्त्वा‍चे निर्णय घेताना आधी तीनही पक्षांमध्ये परस्‍पर समन्वय कसा वाढवता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. आपापसातील विसंवादाचा फायदा भाजपला होऊ नये, असा सूर दोन्ही बाजूच्या नेत्यांचा होता. मुंबई पोलिस आयुक्तांनी  काही दिवसांपूर्वी उपायुक्‍तांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्यांबाबत राष्ट्रवादीत नाराजी होती. ही नाराजी लक्षात घेऊन बदल्या रद्द करण्यात आल्या.

पोलिस आयुक्‍त परमबीर सिंह यांना ‘मातोश्री’वर बोलवून उद्धव ठाकरे यांनी बदली आदेशाविषयी माहिती घेतली होती. याशिवाय पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. याबद्दल ठाकरे  नाराज आहेत. या बैठकीत श्री. पवार यांनी मुख्यमंत्र्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्‍यान, आघाडीतील अंतर्गत वादावर भाजपने टीका केली आहे. पोलिस आयुक्‍तांच्या समितीला अंतर्गत बदल्‍यांचे अधिकार असतात. या बदल्‍यांबाबत आयुक्‍त गृहमंत्र्यांना माहिती देतात. गृहमंत्री त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देत असतात. त्‍यानंतर या बदल्‍या होतात. मात्र, या प्रकरणात आयुक्‍तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली नाही. मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी बदल्‍यांना स्‍थगिती दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com