Agriculture Agricultural News Shivbhojan center starts again Nagar Maharashtra | Agrowon

नगरमध्ये शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने शिवभोजन योजनेत बदल केला असून, ही शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर शहरात दहा केंद्रांना मंजुरी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने ही योजना बंद केली होती. मात्र, गरीब अन्नावाचून वंचित राहू नयेत, यासाठी पुन्हा ही योजना सुरू केली आहे. यासाठी सकाळी ११ ते दुपारी तीन ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने शिवभोजन योजनेत बदल केला असून, ही शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर शहरात दहा केंद्रांना मंजुरी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने ही योजना बंद केली होती. मात्र, गरीब अन्नावाचून वंचित राहू नयेत, यासाठी पुन्हा ही योजना सुरू केली आहे. यासाठी सकाळी ११ ते दुपारी तीन ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.

शिवभोजन केंद्रांवर येणाऱ्या गरजूंना पार्सल देण्यात येत होते. गर्दी टाळण्यासाठी त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्स ठेवला जात होता. केंद्रांच्या बाहेर यासाठी मार्किंग करण्यात आले होते. मंगळवारी दहापैकी सात केंद्रांवर शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. केंद्रचालकही स्वच्छतेचे भान ठेवत गरजूंना भोजन देत होते. शिवभोजन योजना सरकारने पुन्हा सुरू केल्याने गरजूंनी सरकारला धन्यवाद दिले आहेत.
 

एक एप्रिलपासून विस्तार
जिल्ह्यात एक एप्रिलपासून शिवभोजन थाळीचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्‍यात १५० थाळ्या देण्यात येणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळावी, स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे


इतर बातम्या
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच...पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...