‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर श्री बिरोबा यात्रा रद्द

ढालगाव, जि. सांगली ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्याआरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथीलश्री बिरोबा देवाच्या यात्रेचा मंगळवारी (ता.३१) मुख्य दिवस होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द केल्याने मंदिर परिसरात चिटपाखरूही नव्हते.
आरेवाडी येथील श्री बिरोबा यात्रेचा मंगळवारी मुख्य दिवस होता. मात्र मंदिर परिसरात चिटपाखरूही नव्हतं.
आरेवाडी येथील श्री बिरोबा यात्रेचा मंगळवारी मुख्य दिवस होता. मात्र मंदिर परिसरात चिटपाखरूही नव्हतं.

ढालगाव, जि. सांगली ः  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेचा मंगळवारी (ता.३१) मुख्य दिवस होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द केल्याने मंदिर परिसरात चिटपाखरूही नव्हते.  

आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेस गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. पाडव्याच्या सातच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. मंगळवारी (ता.३१) यात्रेचा मुख्य दिवस होता. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यातून सुमारे चार ते साडेचार लाख भाविक हजेरी लावतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा प्रशासन व देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. मंदिर समोरून पडद्याने झाकण्यात आले आहे.

मंदिराच्या समोर व चारही बाजूंना तसेच नागज फाटा येथे यात्रा रद्द असल्याबाबत फलक लावण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त आहे. त्यामुळे या परिसरात भाविक आले नाहीत. नेहमीप्रमाणे सकाळी पाच पुजाऱ्यांनी आरती, पुजा करून मंदिर बंद करण्यात आले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आम्ही श्री बिरोबा यात्रा रद्द केली असल्याचे, देवस्थान समितीचे पदाधिकारी, पोलिस पाटील रामचंद्र पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com