नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याला ‘रामसर’चा दर्जा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या पाणथळ क्षेत्राला ‘रामसर’चा दर्जा प्राप्त झाला असून, वनविभागाने सादर केलेला प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाणथळ म्हणून हे राज्यातीलपहिले व देशातील असे ३१ वे असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली. 

नांदूरमध्यमेश्‍वर वन्यजीव अभयारण्याला ‘रामसर’चा दर्जा प्राप्त होण्याबाबत स्वित्झर्लंडच्या रामसर सचिवालयाकडे केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार २७ जानेवारीला अधिकृत घोषणा होऊन केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाला कळविण्यात आले. जागतिक महत्त्वाच्या पाणथळाच्या यादीत २४१० क्रमांकावर याचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत भारतातील ९ पाणथळाच्या यादीत याचा समावेश असेल.

दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदूरमध्यमेश्वरला ‘रामसर’चा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता पक्षी अभयारण्याचा कायापालट होणार असून, पक्षी आणि पाणथळ संरक्षणदेखील होणार आहे; तसेच देशभरातील पर्यटक या ठिकाणी येतील. त्यामुळे आजूबाजूंच्या गावांना रोजगारदेखील मिळणार आहे. नांदूरमध्यमेश्वरला हा दर्जा प्राप्त झाल्याने संवर्धनासह वन्यजीव अभयारण्याचे संरक्षण प्रभावी होण्यास मदत होईल, अशा विश्वास नांदूरमधमेश्वर अभयारण्याचे सहा. वनसंरक्षक भरत शिंदे यांनी व्यक्त केला. 

काय आहे रामसर?  इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ मध्ये जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ पासून अमलात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९० टक्के देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारतानेसुद्धा हा करार स्वीकारला आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून; तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे शाश्‍वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.   नांदूरमध्यमेश्वर पाणथळाची वैशिष्ट्ये ः

  •  सध्या देशातील २६ पाणथळांच्या यादीत नांदूरमध्यमेश्वर पाणथळाचा समावेश आहे.
  • ५४६ प्रकारच्या जलीय व भूपृष्टीय वनस्पती
  •  ८ प्रकारचे सस्तन प्राणी
  • २६५ पेक्षा जास्त देशी-विदेशी पक्षी
  • २४ प्रकारचे गोड्या पाण्यातील मासे
  • ४१ प्रजातींची फुलपाखरे
  • २० हजारपेक्षा अधिक पाणपक्ष्यांचा आढळ  
  •  ५०० पेक्षा जास्त झुडपांचे प्रकार आणि विविध पाणवनस्पती.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com