Agriculture Agricultural News three villages hits due to cyclone Sindhudurga Maharashtra | Agrowon

भुईबावडा परिसरातील तीन गावांना चक्रीवादळाचा तडाखा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी) परिसरातील तीन गावांना निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळात तीन घरांचे नुकसान झाले. काही बागायतदारांची काजू झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणच्या वीज वाहिन्या तुटून पडल्या.

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी) परिसरातील तीन गावांना निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळात तीन घरांचे नुकसान झाले. काही बागायतदारांची काजू झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणच्या वीज वाहिन्या तुटून पडल्या. वादळामुळे वैभववाडी तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील २९ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.

वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावांना गुरूवारी (ता.४) सायकांळी उशिरा चक्रीवादळाचा तडाखा बसला. तिरवडेतील तीन आणि भुईबावडा गावातील दोन घरांचे नुकसान झाले.भुईबावडा येथील दिपक पांचाळ, तिरवडे तर्फ खारेपटण येथील श्रीधर तुकाराम कलमष्टे आणि रघुनाथ शंकर पवार या तिघांच्या घरांचे छप्पराचे नुकसान झाले. याशिवाय या तीनही गावांतील काजू बागांचे देखील नुकसान झाले आहे. या भागातील वीजखांब, वीज वाहिन्या तुटून पडल्या. या वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडीत झाला होता. भुईबावडा परिसरातील वीज पुरवठा खंडीतच होता. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे आत्तापर्यंत २९ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...