Agriculture Agricultural News travelers will quarantine in Jamkhed Maharashtra | Agrowon

बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जामखेडमध्येच क्वारंटाइन करणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

नगर   ः एका क्षणी सर्वाधिक कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त असा तालुक्‍याचा दोन महिन्यांचा प्रवास झाला. त्यामुळे यापुढे कोणताही धोका होऊ न देण्यासाठी मुंबई-पुण्यासह बाहेरून तालुक्‍यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जामखेडमध्येच क्वारंटाइन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. या ठिकाणी पाण्याची, शौचालयांची व्यवस्था नसल्याने, ते बांधून देण्याची तयारी आमदार रोहित पवार यांनी दाखविली आहे. क्वारंटाइन होणाऱ्या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची, नाश्‍त्याची सोयदेखील करण्याची ग्वाही आमदार पवार यांनी प्रशासनाला दिली.

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाइन करण्याऐवजी जामखेड येथेच क्वारंटाइन करावे, अशी भूमिका व्यक्त झाल्यावर अधिकाऱ्यांच्या बैठका होऊन त्यावर एकमत झाले. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी आमदार रोहित पवार यांना माहिती दिली.

आमदार पवार यांनी जामखेडमध्ये क्वारंटाइन होणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची, राहण्याच्या ठिकाणी शौचालये उभारण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे प्रशासनासमोर निर्माण झालेले पेच सुटले. तालुक्‍यात येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना जामखेड येथे क्वारंटाइन करण्यास सुरवातही झाली.

दरम्यान, तालुक्‍यातील पिंपळगाव (आळवा) येथील तिघांना आणि खर्डा येथील एकाला आरोग्य विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले होते. यापैकी पिंपळगाव येथील तिघांचेही अहवाल कोरोना निगेटिव्ह आले, तर खर्डा येथील एकाचा अहवाल प्राप्त होऊ शकला नाही.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...