विरवडे येथील सीना नदीत वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

सोलापूर ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना नदीच्या पात्रात संचारबंदीत गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला अवैधरित्या वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर दिसले. त्यानंतर तातडीने या पथकाने हे दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना नदीच्या पात्रात संचारबंदीत गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला अवैधरित्या वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर दिसले. त्यानंतर तातडीने या पथकाने हे दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विरवडे येथील सीना नदीच्या पात्रात सर्रास वाळूची चोरी होते. त्यावर पोलिसांचाही सारखे लक्ष असते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यात खंड पडला आहे. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू आहे. या कामात पोलिस व्यस्त आहेत, याचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी विरवडेच्या नदीपात्रात बंधाऱ्याजवळ ट्रॅक्टरच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे काम चालू असल्याचे संचारबंदीचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाला आढळून आले.

त्यावेळी त्यांनी नदीत जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन्ही ट्रॅक्टरचे चालक पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर एमएच-४५- एफ ५८७५ व एमएच-१३ जे-८९१३ ताब्यात घेतले. या ट्रॅक्टरचालकांची पोलिसांनी चौकशी केली असता, चालक रामदास हरी यलगुंडे व प्रवीण हरी भोसले (रा. विरवडे बुद्रुक, ता.मोहोळ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला. दोन्ही ट्रॅक्टरसह ट्रॅाली आणि २१ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com