Agriculture Agricultural News two tractor seized Solapur Maharashtra | Agrowon

विरवडे येथील सीना नदीत वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

सोलापूर  ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना नदीच्या पात्रात संचारबंदीत गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला अवैधरित्या वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर दिसले. त्यानंतर तातडीने या पथकाने हे दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर  ः विरवडे (ता.मोहोळ) येथे सीना नदीच्या पात्रात संचारबंदीत गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला अवैधरित्या वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर दिसले. त्यानंतर तातडीने या पथकाने हे दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विरवडे येथील सीना नदीच्या पात्रात सर्रास वाळूची चोरी होते. त्यावर पोलिसांचाही सारखे लक्ष असते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यात खंड पडला आहे. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू आहे. या कामात पोलिस व्यस्त आहेत, याचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी विरवडेच्या नदीपात्रात बंधाऱ्याजवळ ट्रॅक्टरच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे काम चालू असल्याचे संचारबंदीचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकाला आढळून आले.

त्यावेळी त्यांनी नदीत जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन्ही ट्रॅक्टरचे चालक पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर एमएच-४५- एफ ५८७५ व एमएच-१३ जे-८९१३ ताब्यात घेतले. या ट्रॅक्टरचालकांची पोलिसांनी चौकशी केली असता, चालक रामदास हरी यलगुंडे व प्रवीण हरी भोसले (रा. विरवडे बुद्रुक, ता.मोहोळ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला. दोन्ही ट्रॅक्टरसह ट्रॅाली आणि २१ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.
 


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...