Agriculture Agricultural News Zilla Parishad staff for health survey in Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरातील आरोग्य सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेचे ६०० कर्मचारी वर्ग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

सोलापूर  ः सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना बाधित परिसरातील नागरिकांच्या सर्वेक्षणाची मोहीम आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेत महापालिका कर्मचाऱ्यांची यंत्रणा अपुरी पडत असल्याने आता जिल्हा परिदेतील विविध विभागांमधील ५९७ कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे.

सोलापूर  ः सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना बाधित परिसरातील नागरिकांच्या सर्वेक्षणाची मोहीम आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे. त्या मोहिमेत महापालिका कर्मचाऱ्यांची यंत्रणा अपुरी पडत असल्याने आता जिल्हा परिदेतील विविध विभागांमधील ५९७ कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे.

शहरातील कोरोना बाधित भागांसह, इतर परिसरातील लोकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यासाठी जादाचे कर्मचारी कामाला लावून हे काम सुरु आहे. महापालिकेचे कर्मचारी ती मोहीम राबवत आहेत. पण कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने संपूर्ण शहरातील सर्वेक्षणाला त्यांच्याकडून मर्यादा येत आहेत. त्यामुळे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या सूचनेनंतर त्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील १३० शिक्षक, महिला व बालकल्याण विभागाचे ३५ कर्मचारी या कामामध्ये आहेत. या आधीच आरोग्य विभागासह, संबंधित काही विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण मोहिमेसाठी वर्ग करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये बाधित भागातील प्रत्येक कुटुंबीयांचे नाव, बाहेरच्या गावातून कुणी आले असल्यास त्या संदर्भातील माहिती, ताप, खोकला व श्वसनाच्या विकारांबाबतची माहिती घेण्यात येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...