रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस

रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस
रविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांशी भागात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, तर रविवारपर्यंत (ता. २९) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मध्य प्रदेशात असलेले कमी दाब क्षेत्र उत्तर प्रदेशकडे सरकले आहे, तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून कमी दाबाच्या केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. रविवारपर्यंत कोकणात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.  बुधवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये- स्त्रोत कृषी विभाग) :  कोकण : शिरगाव ४३, मंडणगड ४२, म्हाप्रल ३९, देव्हरे ४५, तुलसानी ३१, पाचल ७६, सातवली ४२, अंबोली ४५.  मध्य महाराष्ट्र : नाणशी ३१, बोराडी ३०, तळोदा ३२, सोमवल ४५, रोशणमाळ ३८, अक्कलकुवा ४६, खापर ३९, मोरांबा ३९, दाब ७७, मोलगी ७४, वडफळी ५४, शेंडी ६९, मुठे ३२, भोलावडे ६८, काले ३०, लोणावळा ५८, आपटाळे ३८, महाबळेश्‍वर ३७, तापोळा ५३, लामज ८२, बाजार ३१, करंजफेन ४५, आंबा ५६, राधानगरी ६५, साळवण ३८, गवसे ३६.  विदर्भ : चिखलदरा २८, सेमडोह ३६, जरावंडी ३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com