agriculture article in Marathi pod boring pests in pigeon pea | Agrowon

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

डॉ. पी. आर. झंवर, योगेश मात्रे, विलास खराडे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पोषक आहे. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरतेवेळी दाणे खात असल्याने कोवळ्या दाण्याचे सुमारे ६०-८० टक्के नुकसान होते.

काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पोषक आहे. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरतेवेळी दाणे खात असल्याने कोवळ्या दाण्याचे सुमारे ६०-८० टक्के नुकसान होते.

किडीची ओळख-
शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer) :
शास्त्रीय नाव ः हेलिकोवर्पा आर्मिजेरा.
तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा रंग हिरवट पिवळसर असून, अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. एक मादी मादी कोवळी पाने, कळ्या, फुले तसेच शेंगावर सरासरी ८०० अंडी घालते. एक अळी सुमारे ३० ते ४० शेंगांना नुकसान करून आपली अवस्था पूर्ण करते. या अळीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.

१) सध्या तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यःपरिस्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडीच्या अळ्या कळ्या व फुलांवर दिसू लागल्या आहेत.
२) सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असून, वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण करता येते.
३) प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या दाण्यावर अळी उपजीविका करते.

उपाययोजना

१) तुरीमध्ये एकरी चार कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांपेक्षा एक फूट उंचीवर लावावेत.

२) तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.

३) पीक कळी अवस्थेत असताना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

४) घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. (२५० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे हेक्टरी ५०० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

५) जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर आढळून आल्यास फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.८ मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १ मि.लि. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.५ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डायअमाईड (३९.३५ एस.सी.) ०.२ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ०.२५ मिली
पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने कीडनाशक बदलून करावी.

डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४
योगेश मात्रे (पी.एचडी. विद्यार्थी), ७३८७५२१९५७

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कडधान्ये
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवडखरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची...कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणकाही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
तयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...
तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...
तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...
तुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
तूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...
अनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....
तंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...