agriculture article in marathi wheat planning for late sowing | Agrowon

उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजन

डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर, डॉ. सुधीर नवाथे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

या वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम ठोकल्यामुळे जमिनीला वाफसा मिळाला नाही. वाफशाअभावी बागायती गव्हाच्या पेरणीला उशीर झाला. महाराष्ट्रात दरवर्षी उशिरा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३० टक्के असते. या वर्षी त्यात वाढ होणार आहे.

या वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम ठोकल्यामुळे जमिनीला वाफसा मिळाला नाही. वाफशाअभावी बागायती गव्हाच्या पेरणीला उशीर झाला. महाराष्ट्रात दरवर्षी उशिरा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३० टक्के असते. या वर्षी त्यात वाढ होणार आहे.

बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर अशी आहे. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणीसाठी होणाऱ्या दर पंधरवड्याच्या उशिरासाठी हेक्टरी २.५ क्विंटल (एकरी एक क्विंटल) उत्पादन घटते. गहू पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हास अनुकूल वातावरण मिळत नसल्याने उत्पादनात घट येते.

गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी नियोजन

पेरणीची वेळ ः नोव्हेंबरचा शेवटचा पंधरवडा ते डिसेंबरचा पहिला पंधरवडा (१६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर). पेरणी खोल पाभरीने शक्यतो दक्षिणोत्तर करावी.

हेक्‍टरी बियाणे ः १२५ ते १५० किलो

खत व्यवस्थापन (नत्र, स्फुरद व पालाश किलो/हेक्टरी) ः ९०:६०:४० (१/३ नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी, उरलेला नत्र दोन वेळेस पहिले पाणी आणि दुसरे पाणी देतेवेळी देणे)

पाणी व्यवस्थापन ः १५ दिवसांच्या अंतराने ६ पाणी

शिफारस केलेले वाण ः एम.ए.सी.एस.६२२२,एच.डी.३०९०, एनआयएडब्लू-३४, एकेएडब्लू-४६२७, एकेएडब्ल्यू-४२१o, एच.डी.२९३२(स), राज ४०८३(स), एनआयएडब्लू-१९९४

सरासरी उत्पादन (क्विंटल/हे) ः ४५ ते ५०

उशिरा पेरणीसाठीचे वाण ः

महाराष्ट्रातील आघारकर संशोधन संस्थेने विकसित केलेला गव्हाचा सरबती वाण एमएसीएस-६२२२ (MACS ६२२२) वेळेवर पेरणी केल्यास सरासरी उत्पन्न ४८ क्विंटल प्रतिहेक्टर देतो व अनुकूल परिस्थितीत या वाणाची कमाल उत्पादन क्षमता ६० क्विंटल/हेक्टर इतके आहे. हा वाण उशिरा पेरणीसाठी (१ ते १५ डिसेंबर) व दोन ते तीन पाण्यांच्या पाळ्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद देतो. हा वाण तांबेरा प्रतिकारक, मोठा दाणा, पाव व चपातीसाठी उत्तम आहे. संस्थेच्या होल, बारामती येथील प्रायोगिक प्रक्षेत्रावर, बदलत्या हवामानात, वेगवेगळ्या तारखांना केलेल्या पेरणीचे निष्कर्षही उत्तम असून, अन्य वाणाच्या तुलनेमध्ये एमसीएस ६२२२ चे उत्पादन अधिक असल्याचे दिसून आले आहे.
- फुले समाधान (एन.आय.ए.डब्लू १९९४) हा सरबती वाणदेखील बागायती वेळेवर व उशिरा पेरणीसाठी महाराष्ट्रात प्रसारित केलेला आहे. त्याचे वेळेवरील पेरणीतील उत्पादन ४६.१२ क्विंटल प्रतिहेक्टर, तर उशिरा पेरणीखाली उत्पादन ४४.१३ क्विंटल/हेक्टर मिळते.

बीजप्रक्रिया आणि पेरणी

  • पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅकटर व २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
  • पेरणी उथळ (५ ते ६ से.मी खोल) करावी, त्यामुळे उगवण चांगली होते.
  • पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी केल्यास आंतरमशागत करणे सोईचे होते.
  • जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदी व ७ ते २५ मीटर लांबीचे सारे पाडावेत.

आंतरमशागत ः बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन ः जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड वातावरण राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचन उपयुक्त ठरते. मात्र, तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसांदरम्यान द्यावे. गहू पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यानंतर काही वेळा गव्हाच्या दाण्यावर काळा डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दाणे भरताना तुषारवरील क्षेत्रात मॅन्कोझेब किंवा काँपर ऑक्सिक्लोराईड २ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बागायत उशिरा पेरणीच्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.

वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे.
संवेदनशील अवस्था .................पेरणी नंतरचे दिवस
मुकुटमुळे फुटण्याचे वेळी.............१८-२०
जास्तीत जास्त फुटवे अवस्था........३०-३५
कांडी धरण्याची वेळ..................४५-५०
फुलोरा अवस्था.......................६५-७०
दाण्याचे दुधाळ अवस्था..............८०-८५
दाण्यात चिक भरण्याची वेळ.........९५-१००

पाण्याची कमतरता असल्यास, तर पाण्याचे नियोजन खालीलप्रमाणे करावे.
ओलिताची सोय/ उपलब्ध पाळ्या ..........पाणी देण्याची वेळ (पेरणीपासून दिवसांनी)
एक ओलीत शक्य असल्यास................४० ते ४२
दोन ओलीत शक्य असल्यास................२१ व ६५
तीन ओलीत शक्य असल्यास................२१, ४२, ६५

उत्पादनातील घट टाळण्यासाठी...  

  • बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत वाणांचा वापर करावा.
  • उशिरा पेरणीसाठी गव्हाच्या दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पेरणी ५ ते ६ सेंमी.
  • हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२५ चे १५० किलो एवढे ठेवावे.

डॉ. व्ही. एस. बाविस्कर, ८३७४१७४७९७
(कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे.)


इतर तृणधान्ये
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
गहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...
गहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...