agriculture five rupees subsidy required for milk Maharashtra | Agrowon

दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचे भाव प्रतिलिटर १९ रुपयांपर्यंत घसरले आहेत.

पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचे भाव प्रतिलिटर १९ रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे शासनाने पाच रुपये अनुदान योजना तत्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी डेअरी उद्योगाने केली आहे. 

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी डेअरी उद्योगाची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे दूध विक्रीत घट झाली. दूध पावडरचे दर पडल्यामुळे पावडर प्रकल्पचालकांनीही दूध खरेदी घटविली आहे. 

राज्यातील अनेक खासगी व्यावसायिक दूध उत्पादक प्रकल्पांनी गाय दुधाचे खरेदी दर १९ रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. त्यामुळे आता स्थिती अजून उलटी झाली आहे. चांगले दूध देणाऱ्या व्यावसायिकांकडील दुधाचा पुरवठा वाढला आहे. परिणामी अतिरिक्त दुधाची समस्या उभी रहात आहे. त्यामुळे ‘दूध संकलन बंद’ प्रक्रिया राबविण्याशिवाय डेअरी प्रकल्पांना पर्याय राहिलेला नाही. 

कोरोनानंतरच्या स्थितीत दूध व्यावसायिकांबरोबरच दूध उत्पादक शेतकरी संकटात आलेले आहेत. त्यामुळे शासनाने गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये करून टॅंकरने दूध पुरवठा केल्यास अडीच रुपये वरकड खर्च देण्याचा निर्णय घ्यावा. गरज भासल्यास दूध खरेदीसाठी पाच रुपये अनुदान योजना राबवावी, असे दूध संघाचे म्हणणे आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...