Agriculture Credit : बाजार समितीकडून शेतीमाल तारण कर्जासाठी १ कोटीची तरतूद

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) शेतीमाल तारणकर्ज योजनेसाठी स्वनिधीतून १ कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे.
Agricultural credit
Agricultural creditAgrowon

परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने (Parbhani APMC) चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) शेतीमाल तारणकर्ज योजनेसाठी (Agriculture Mortgage Loan Scheme) स्वनिधीतून १ कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. गरजू शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा (Mortgage Scheme) लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती समशेर वरपुडकर यांनी केले आहे.

Agricultural credit
Soybean Rate : यंदा किती सोयाबीन उत्पादन होणार?

शेतीमालाची साठवणूक करून बाजारभावात सुधारणा झालेली असताना विक्री केल्यास फायदा होतो. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने २००९-१० पासून परभणी बाजार समितीतर्फे मागील सात वर्षांपासून बाजार समिती ही योजना स्वनिधीतून राबवीत आहे.

गतवर्षी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा तारण ठेवून ३९ शेतकऱ्यांना ५५ लाख रुपये तारणकर्ज वाटप वितरीत करण्यात आलेले आहे. त्याची प्रतिपूर्ती ही करण्यात आलेली आहे. चालू आथिक वर्षासाठी या योजनेसाठी स्वनिधीतून १ कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे.

Agricultural credit
Crop Damage : तीन दिवसांपासून पाऊस; सोयाबीनमध्ये तळे

...अशी असेल योजना

याअंतर्गत वखार महामंडळाचे गोदामात शेतकऱ्यांनी शेतीमाल ठेवल्या नंतर वखार पावती देण्यात येईल त्यावर पोत्यांची संख्या, मालाचे अंदाजे वजन, प्रति क्विंटल दर व त्या मालाची एकूण किंमत नमूद केल्या जाईल.

तेवढ्या किमतीचा विमा वखार महामंडळ उतरविला. वखार पावती, शेतमाल तारण कर्ज अर्ज, १०० रुपये मुद्रक पेपर वर करारनामा, ७-१२ उतारा (पीकपेऱ्यासह), बँक पासबुक, आधार कार्डाची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्र कृषी उत्पन्न बाजार समितीत जमा केल्या नंतर तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, हळद, भात, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका या शेतीमालाच्या प्रतवारीनुसार प्रचलित दराच्या एकूण किमतीच्या किंवा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाच्या या दोन्ही पैकी जो भाव कमी असेल त्याच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याजदराने १८० दिवसांकरिता बाजार समिती मार्फत तारण कर्ज दिले जाईल.

कर्ज रकमेची धनादेशाद्वारे अदाई करण्यात येईल. कर्ज रक्कमेची व्याजासह सहा महिन्यांत परतफेड करून तारण माल ताब्यात न घेतल्यास या शेतीमालाची विक्री केली जाईल. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती समशेर वरपुडकर, उपसभापती दिलीप आवचार, सचिव संजय तळणीकर, संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com