Agriculture Irrigation : अद्याप जिल्ह्यातील १० लाख हेक्टर क्षेत्र कोरडेच

दोन्ही तालुक्यातील शेतीला उजनीचे पाणी मिळण्यासाठी उपसा सिंचन योजनांचे नियोजन करण्यात आले असले तरी अद्याप या योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत.
Dry Land
Dry LandAgrowon

Solapur News : पिढ्यानपिढ्यानं दुष्काळाच्या चटक्यांनी गलितगात्र झालेल्या दुष्काळी पट्ट्यामधील सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur District) तब्बल नऊ तालुक्यांमध्ये जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या महाकाय उजनी धरणानं (Ujani Dam) हरितक्रांती (Green Revolution), धवलक्रांती आणि औद्योगीक क्रांतीची पहाट आणली. पण अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यासाठी उजनी धरण अद्याप ‘मृगजळ’ ठरत आहे.

या दोन्ही तालुक्यातील शेतीला उजनीचे पाणी मिळण्यासाठी उपसा सिंचन योजनांचे नियोजन करण्यात आले असले तरी अद्याप या योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर उजनीबाबत अन्याय झाला आहे.

इतर तालुक्यांच्या दृष्टिने बार्शी आणि अक्कलकोटसाठी उजनीचे पाणी हे वाकुल्या दाखविणारे ठरले आहे. दरम्यान दुष्कळी सोलापूर जिल्ह्यातील अद्याप अंदाजे दहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे गरजेचे आहे.

Dry Land
Ujani Canal : उजनी कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू

उजनीवरील अर्धवट उपसा सिंचन योजना आणि महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना याद्वारे हे क्षेत्र ओलिताखाली येण्याची शाश्‍वती आहे. त्यासाठी गरज आहे ती प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आणि प्रशासनाच्या धडाकेबाज कर्तृत्वाची. त्यासाठी व्हीजन ठेऊन कृतिशील होण्याची गरज आहे.

सिंचनाची वास्तव स्थिती

प्रत्यक्ष उजनी धरणाच्या लाभामधून जिल्ह्यातील नऊ तालुक्यामधील १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आले आहे. शिवाय उपसा सिंचन आणि जिल्ह्याचे लघू-मोठे प्रकल्प यातून अंदाजे ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

सोलापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे तब्बल अंदाजे १३ लाख हेक्टर इतके आहे. अद्याप १० लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे गरजेचे आहे. बार्शी आणि अक्कलकोट या दोन तालुक्यामधील शेतीला उजनीचे पाणी मिळण्यासाठी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.

त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उपसा सिंचन योजनांची काम गतीने होण्याची गरज आहे. शिवाय जलयुक्त शिवार योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास सकारात्मक परिणाम उमटतील.

सिंचनासाठी उजनी धरणाचा माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांनाच केवळ लाभ झाला आहे.

Dry Land
Weather Update : ‘उजनी’ पाणलोट क्षेत्र गारठले
मुख्य उजनी धरणासह अन्य प्रकल्पांमुळे सोलापूर जिल्ह्यातील साधारण ३ लाख हेक्टर क्षेत्र बागायती झाले.तथापि अद्याप तब्बल १० लाख हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. बार्शी आणि अक्कलकोट या दोन्ही तालुके उजनीवाचून तहानलेलेच आहेत. या तालुक्यांना उजनीचे पाणी मिळावे, यासाठी मंजूर करण्यात आलेल्या उपसा सिंचन योजनांची कामे गतीने पूर्ण व्हावीत, तसेच जलयुक्त शिवार योजनेचे प्रकल्प जिल्ह्यात उभारणे गरजेचे आहे.-
सुरेश सोडल, सेवानिवृत्त सचिव, जलसंपदा विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com