कोल्हापूर जिल्ह्यात १० हजार हेक्‍टर पिके पाण्याखाली

जिल्ह्यात अतिवृष्टी, पुराचा ४ हेक्‍टर शेतीला फटका बसला आहे. तर, सुमारे दहा हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र पुराच्या पाण्याखाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain), पुराचा ४ हेक्‍टर शेतीला फटका (Agriculture Damage) बसला आहे. तर, सुमारे दहा हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र पुराच्या पाण्याखाली आहे. मात्र, एक ते दोन दिवसांत पूर (Kolhapur Flood) ओसरला तर या पिकांना फारसा फटका बसणार नाही. कागल, चंदगड, भुदरगड तालुक्‍यांतील भात, सोयाबीन, भुईमूग शेती बाधित (Agriculture Loss) झाली आहे.

Crop Damage
Vidarbh Flood : विदर्भातील पुराला जबाबदार कोण?

जिल्ह्यात १ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामध्ये भात, भुईमूग व सोयाबीनचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे रोपे खराब झाली आहेत. तर, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. कागल तालुक्‍यात भात पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तब्बल २७ हेक्‍टरवरील भात खराब झाली आहेत. तर, ५ हेक्‍टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Rain Update : हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍यता

दरम्यान, जिल्ह्यात पूरस्थितीमुळे नदीकाठचे तब्बल दहा हजार हेक्‍टरहून अधिक ऊस, भात आणि भुईमूग पीक पाण्याखाली गेले आहे. यामध्ये ऊस पिकाला आणखी काही दिवस पाण्यात राहिले तर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, भात आणि सोयाबीन पिकांना याचा निश्‍चितपणे फटका बसणार आहे.

करवीर तालुक्‍यात अधिक नुकसान

पूर ओसरत नाही, तोपर्यंत याचा अंदाज लावता येत नाही. जी पिके पाण्याखाली गेली आहेत, यामध्ये करवीर तालुक्‍यातील सर्वाधिक शेती आहे. पाणी ओसरल्यानंतर याचे पंचनामे केले जातील. पण, जिल्ह्यात धरणक्षेत्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. याचा फायदा होऊन पूर कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील ४९.८८ हेक्‍टरवरील भात, भुईमूग आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित पिकांचे पंचनामे सुरू आहेत.
जालिंदर पांगारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com