Wheat Production : गव्हाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन

खानदेशात गव्हाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन येत आहे. काही शेतकऱ्यांना एकरी १३ क्विंटलवर उत्पादन हाती आले आहे.
Wheat Production
Wheat ProductionAgrowon

Wheat Market Update जळगाव ः खानदेशात गव्हाचे (Wheat Production) एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन येत आहे. काही शेतकऱ्यांना एकरी १३ क्विंटलवर उत्पादन हाती आले आहे. परंतु दर कमी आहेत. १४७ प्रकारच्या गव्हाचे दर (Wheat Rate) तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर लोकवन प्रकारच्या गव्हाचे दर २१०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

गव्हाची आवक सध्या बाजारात कमी आहे. कारण फक्त नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या गव्हाची आवक बाजारात होत आहे.

कमाल शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी नोव्हेंबरअखेरीस व डिसेंबरमध्ये केली आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही पेरणी केली आहे. या क्षेत्रातील गहू पीक पक्व होत आहे.

Wheat Production
Wheat Production: गव्हाचा प्रमुख निर्यातदार असणाऱ्या भारतावर आता आयातीची वेळ येणार?

त्याची मळणी पावसाने लांबत आहे. परंतु वेळेत किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या गव्हाची मळणी पूर्ण झाली आहे. त्यात एकरी १० ते १२ क्विंटल असे उत्पादन येत आहे.

चांगले व्यवस्थापन व खतांची मात्रा पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना एकरी १३ ते साडेतेरा क्विंटल प्रतिएकर असे उत्पादन मिळत आहे. या क्षेत्रातील गव्हाचे उत्पादन दर्जेदार व उत्तम आहे. परंतु बाजारात दर मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहेत.

मागील हंगामात प्रतिक्विंटल २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर लोकवन गव्हास होता. यंदा लोकवन गव्हाचे दर २१०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

तर १४७ प्रकारच्या गव्हाचे दर मागील वर्षी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल किमान व त्यापेक्षा अधिक होते. यंदा मात्र १४७ प्रकारच्या गव्हाचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल असे कमाल पातळीपर्यंत आहेत.

Wheat Production
Wheat Market : गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त राहतील का?

यंदा दर क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी कमी आहेत. दुसरीकडे उत्पादन खर्च, खते, बियाणे, मळणी, मजुरी आदी खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हवा तसा नफा नाही.

जुजबी निधी हाती शिल्लक राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. लहान शेतकरी निधीच्या विवंचनेत गव्हाची विक्री करीत असून, त्यांचे अधिकचे नुकसान, पिळवणूक होत आहे.

काही शेतकऱ्यांनी गहू साठवून ठेवला आहे. खानदेशातील जळगाव, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव अशा सर्वच बाजारांत गव्हाची आवक होत आहे. धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथेही गव्हाची आवक होत आहे.

आवक कमी असतानाही दर कमी

नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा व तळोदा येथील बाजारातही गहू आवक बऱ्यापैकी आहे. गव्हाची आवक यंदा काहीशी कमी आहे. कारण पेरणी अपेक्षित क्षेत्रातच झाली आहे. पेरणी वाढलेली नाही. तसेच उत्पादनही मागील हंगामासारखेच आहे. सुरुवातीला आवक कमी असताना दर कमी आहेत. या बाबतही शेतकऱ्यांत संताप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com