
Junnar Tourism पुणे ः जुन्नरच्या पर्यटन (Junnar Tourism) विकासासाठी पुढील दोन वर्षांत १०० कोटी रुपयांचा उपलब्ध करून देण्यात येईल; तसेच हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन दरवर्षी करण्याची घोषणा पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केली.
राज्य सरकारकडून हिंदवी स्वराज्य महोत्सवांतर्गत भव्य महाशिव आरतीचे रविवारी (ता.१९) सायंकाळी जुन्नर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री लोढा म्हणाले, ‘‘यावर्षी शिवजयंतीला उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन खेडे आणि तंबू खेडे उभे करण्यात येईल. तसेच पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.’’
यावेळी करण्यात आलेल्या महाशिव आरतीसाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार श्री. दरेकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.