Rain Update : जळगाव जिल्ह्यात तीन तालुक्यांत १०० टक्के पाऊस

पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाला पावसाचा धोका तयार होत आहे. काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची हानी सुरू झाली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के पाऊस (Rainfall) झाला असून, यावल, भडगाव, चाळीसगाव या तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाला (Cotton Crop) पावसाचा धोका तयार होत आहे. काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची हानी (Cotton Crop Damage) सुरू झाली आहे.

१५ ऑगस्टला शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. नंतर मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करता आली. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिके कोमेजत होती. बुधवारी (ता. ३१) श्रीगणेशाच्या आगमानाबरोबर पावसाने मका, ज्वारी, कोरडवाहू कापूस, सोयाबीन आदी पिके पिके तरारली आहेत. कोरडवाहू कापसाला पावसाचा धोका कमी आहे. परंतु पूर्वहंगामी कापूस पिकात फूल, पाते गळ सुरू झाली आहे. तसेच बोंडांचेही अंशतः नुकसान झाले आहे. काळ्या कसदार जमिनीत काही भागात पाणी साचत आहे. वाफसा स्थिती तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीकाठी दिसत नाही.

Rain Update
Heavy Rain : हवालदिल शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी

शुक्रवारी (ता.२) जिल्ह्यात अपवाद वगळता पाऊस झाला नाही. जळगाव, धरणगाव, भुसावळ, चोपडा आदी भागांत पावसाने उसंत घेतली. यामुळे शेतीकामे वेगात सुरू झाली आहे. फवारणीची कामे शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.३) हाती घेतली. तसेच मुगाच्या पक्व शेंगा काढणीलाही अनेकांनी वेग दिला.

तालुका शुक्रवार (ता. २) अखेर पडलेला पाऊस

जळगाव ८५.९

भुसावळ ७९.७

यावल १०३.१

रावेर ९१.६

मुक्ताईनगर ९३.५

अमळनेर ९३.९

चोपडा ८९.५

एरंडोल ८९.५

पारोळा ७८.९

चाळीसगाव १००.८

जामनेर ८४.९

पाचोरा ८३.५

भडगाव १००

धरणगाव ८१.१

बोदवड ७९.५

एकूण ८९.९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com