
Nagar Agriculture News : शेतकऱ्यांना अनुदानावर (Agriculture Subsidy) शेती अवजारांचा लाभ दिला जातो. नगर जिल्ह्यात दोन वर्षांत १० हजार ३३३ शेतकऱ्यांना विविध शेती अवजारांचा लाभ दिला आहे.
शेतकऱ्यांना अनुदानापोटी ५६ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. सर्वाधिक मागणी ट्रॅक्टरला आहे.
दोन वर्षांत सुमारे १३०२ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा लाभ (Tractor) दिला असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर यासह विविध शेतीसाठी उपयुक्त अवजारांचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषिविकास योजनेअंतर्गत कृषी अभियांत्रिकीकरण (आरकेव्हीवाय), राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना व कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबवली जात आहे.
पूर्वी या योजनेतून लाभ मिळावा, यासाठी अर्ज केले. त्यातून त्या त्या तालुक्यात सोडत काढली जायची. चार वर्षांपासून ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित केले. त्यामुळे ‘महाडीबीटीवर’ अर्ज केल्यास आता एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.
साधारण आठ दिवसाला वरिष्ठ पातळीवर सोडत काढली जाते. नगर जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले आहेत.
शेतकऱ्यांना अनुदानापोटी ५६ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. यांत्रिकीकरणात ट्रक्टर व पॉवर टिलरला सर्वाधिक मागणी आहे.
दोन वर्षांत ५० हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी अनुदानाची मागणी केली आहे.
नगर जिल्ह्यात दोन वर्षांत १३०२ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी व २६२ शेतकऱ्यांना पॉवर टिलरसाठी अनुदान मिळाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.