Crop Damage Compensation : अखेर पीक नुकसानीचे १००८ कोटी आले

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी मराठवाड्याच्या वाट्यावर १००८ कोटी रुपये आल्याचे शासन निर्णयातून स्पष्ट झाले होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

औरंगाबाद : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या (Crop Damage Due To Heavy Rain) भरपाई पोटी (Crop Damage Compensation Marathwada) मराठवाड्याच्या वाट्यावर १००८ कोटी रुपये आल्याचे शासन निर्णयातून स्पष्ट झाले होते.दोन दिवसात निधी वितरणाला (Fund Distribution) सुरवात होईल असं कृषिमंत्र्यांनीही सांगितलं होत. परंतु शासनाचा मदतनिधी पोहचला नव्हता. तो निधी मंगळवारी (ता. २०) विभागस्तरावरून जिल्हास्तरावर नुकसानग्रस्तांच्या खात्यावर पोहोचविण्यासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदा जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्यातील बाधितांना मदत देण्याकरिता ३५०१ कोटी ७१ लाख २१ हजार रुपये इतका निधी सर्व विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता अनुक्रमे ३४४५ कोटी २५ लाख ५५ हजार व ५६ कोटी ४५ लाख ६६ हजार असा निधी मदत म्हणून शेतकऱ्यांना वितरित केला जाणे अपेक्षित आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

राज्यात २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झालेल्या २७ लाख ६५ हजार ७२७ शेतकऱ्यांना तसेच ३२५ गावातील शेतजमिनीचे नुकसान झालेल्या २३६८३.२७ हेक्टरसाठी शासनाकडून घोषित दर व क्षेत्र मर्यादेनुसार राज्यातील नुकसंग्रस्तना मदत अपेक्षित आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरवरील शेतीपिकांचे अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. जिरायती पिकासाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकासाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित ही मदत दिली जाणार आहे.

Crop Damage
Crop Damage : दानापूर परिसरात पिकांचे नुकसान

सततच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई बाकीच

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी आणखी ५९९ कोटी ७ लाख ९० हजार रुपये मदतनिधींची मराठवाड्याला आवश्यकता आहे. सततच्या पावसाने नांदेड वगळता ७ जिल्ह्यातील ६ लाख ९१ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीच्या निधीचा प्रश्न मार्गी

गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांच्या ७२४९१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या ९८ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीचाही प्रश्न बाकी होता.तो मार्गी लागला असून तो निधीही तीनही जिल्ह्यात नुकसंग्रस्तांना वितरित करण्यासाठी जिल्ह्याकडे पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अपेक्षित भरपाई

जिल्हा शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) निधी

जालना ६८९८ २३११.७९ ३ कोटी ७१ लाख

परभणी १७५७ ११७९ १ कोटी ६० लाख ३४ हजार

हिंगोली १४१८१८ ११३६२० १५७ कोटी ४ लाख

नांदेड ७७६३८९ ५२७४९१ ७१७ कोटी ८८ लाख

लातूर ५१७३३ २७४२५.३७ ३७ कोटी ३० लाख

उस्मानाबाद ८०९७७ ६६७२३.२० ९० कोटी ७४ लाख

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com