Fertilizer Shortage : पोटॅशसह १०.२६.२६ खताचा खानदेशात तुटवडा

Fertilizer Market : जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल भागात १०.२६.२६ खताची कृत्रीम टंचाई तयार झाली आहे.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon

Jalgaon News : जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल भागात १०.२६.२६ खताची कृत्रीम टंचाई तयार झाली आहे. १०.२६.२६ खतावर नॅनो युरिया व इतर सूक्ष्मअन्नद्रव्यांची लिकींग सुरूच आहे. पोटॅशही मिळत नाही. कृषी विभाग खते मुबलक असल्याचे कागदी घोडे नाचवीत आहे. शेतकरी मात्र या खतांच्या कृत्रीम टंचाईने मेटाकुटीस आले आहेत.

पूर्वहंगामी कापूस लागवड लवकरच सुरू होईल. तसेच केळीला खतांची गरज आहे. नवती किंवा मृग बहरातील केळी लागवड रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात सुरू आहे. त्यासाठी बेसल डोसची गरज असते. १०.२६.२६ , डीएपी पुरेसे नसल्याने काही शेतकरी फॉस्फेट व इतर खते देवून आपली कार्यवाही पूर्ण करून घेत आहेत.

जळगाव शहरासह, चोपडा, पारोळा, रावेर, यावल, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार येथे १०.२६.२६ व डीएपी खताचा तुटवडा आहे. शेतकरी या शहरांत खते घेण्यासाठी येतात. पण परंतु दुकानांवर खत मिळत नाही. ओळख, परिचयातून कसेबसे खत मिळते.

Fertilizer Shortage
Fertilizer Demand : खरिपासाठी दोन लाख टन खतांची मागणी

त्यावरही लिकींग केली जाते. एका शेतकऱ्याला चार ते पाच गोण्याच काही वेळेस मिळतात. पण त्यासाठी लिकींगची खते घ्यावी लागतात. नॅनो युरियादेखील दिला जातो. खत विक्रेत्यांनुसार खतपुरवठादार कंपन्याच लिकींगशिवाय १०.२६.२६ व डीएपी हे खत देत नाहीत.

यामुळे ही खते घ्यायची असल्यास लिंकींगवरील खतेही आणावी लागतात. पुढे ती शेतकऱ्यांना द्यावी लागतात. पण काही विक्रेते १० हजार रुपयांच्या १०.२६.२६ व डीएपी खतांवर तीन ते चार हजार रुपयांची सूक्ष्मअन्नद्रव्ये व इतर खते लिंकींग करून देतात व नफेखोरी करतात, असाही प्रकार सुरू आहे.

Fertilizer Shortage
Fertilizer Subsidy : सरकार खतांवर अनुदान नेमकं कुणासाठी देतं?; शेतकऱ्यांसाठी की खत कंपन्यांसाठी?

दावे फसवे, कारवाई शून्य

धुळे, जळगावात कृषी विभागाने खतटंचाईबाबत पाठपुरावा केला, परंतु खत विक्रेत्यांवर कडक कारवाई अपवादानेच झाली आहे. जळगाव शहर, रावेर, मुक्ताईनगर, यावल, शहादा, तळोदा, शिरपूर, धुळे, शिंदखेडा येथे खत लिकींग, खते असूनही न देणे यावर कारवाई झालेली नसल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात या महिन्यात फक्त चोपडा, अमळनेरात खत विक्रेत्यांवर कारवाई झाली. पत्रके प्रसिद्ध करून खते किती मुबलक आहेत, किती पुरवठा आहे, संरक्षित (बफर) साठा मुबलक आहे, अशी माहिती त्यातून दिली. परंतु लिकींग, कृत्रीम टंचाई याबाबत चकार शब्द काढायला कृषी विभाग तयार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com