Kharif Sowing : पुणे विभागात १०३ टक्के पेरणी

पुणे विभागात सरासरीच्या दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी १० लाख ९२ हजार १४९ हेक्टर म्हणजेच १०३ टक्के पेरणी झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

पुणे : जुलैमध्ये झालेल्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पुणे विभागात सरासरीच्या दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी १० लाख ९२ हजार १४९ हेक्टर म्हणजेच १०३ टक्के पेरणी (Karif Sowing) झाली आहे. पाऊसमान (Rainfall) चांगले असल्याने उत्पन्न (Farmer Income) ही चांगले येण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

Kharif Sowing
Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात कुठेही दुबार पीक पेरणी झालेली नाही. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले नाही. बाजरी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. मूग व उडीद पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. मका पीक कणसे लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीक फुले लागण्याच्या ते पाते लागण्याच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्यातही भात पिकाची पुनर्लागवड अंतिम टप्यात आहे. बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीकवाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील मूग, उडीद, मका, भुईमूग व सोयाबीन पिके वाढीच्या अवस्थेत असून, पीकपरिस्थिती सर्वसाधारण आहे. बाजरी पीक फुटवे फुटण्याच्या व वाढीच्या अवस्थेत असून पीकपरिस्थिती सर्वसाधारण आहे. तूर फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, राहुरी, संगमनेर तालुक्यांतील काही भागांमध्ये मका पिकावर सुमारे ६२० हेक्टर क्षेत्रावर अमेरिकन लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला असून, क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर इंदापूर व जुन्नर तालुक्यात ७ हेक्टर क्षेत्रावर अमेरिकन लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. तसेच सोयाबीन पिकावर जुन्नर तालुक्यात ६५ हेक्टर क्षेत्रावर अल्प प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. सोलापूरमध्येही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच मूग, उडीद, तूर व सोयाबीन पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनासंबंधी उपाय योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये :

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के

नगर --- ५,७९,७६८ -- ५,९१,१२७ -- १०२

पुणे --- १,९५, ७१० -- १,७२,०३३ --- ८८

सोलापूर --- २,८९,५७० -- ३,२८,९८९ -- ११४

एकूण --- १०,६५,०४८ -- १०,९२,१४९ --- १०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com