Gram Panchayat Elections : पुणे जिल्ह्यात २२१ सरपंचपदांसाठी १,०५० अर्ज दाखल

पुणे जिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २२१ सरपंचपदांसाठी १,०५० अर्ज, तर १,६४२ सदस्यपदांसाठी ५,१०७ अर्ज दाखल झाले आहेत.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsAgrowon

पुणे : पुणे जिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २२१ सरपंचपदांसाठी १,०५० अर्ज, तर १,६४२ सदस्यपदांसाठी (Nomination For Sarpanch) ५,१०७ अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणावर सुरू केल्याने निवडणुकीचे वारे वेगाने वाहताना दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारपर्यंत (ता. ७) अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : नगर जिल्ह्यात सरपंच पदांसाठी १२८२ अर्ज

काही दिवसांपूर्वी कार्यकाळ संपलेले सरपंच व सदस्य या निवडणुकीसाठी पुन्हा रिंगणात उतरत आहेत. अनेक गावांमध्ये आरक्षण सोडतीमुळे काही उत्सुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. मात्र, ज्या ठिकाणी जुन्या सरपंच व सदस्यांना उभे राहण्याची संधी आहे, अशा ठिकाणी माजी उमेदवार संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात आहेत. उमेदवारांकडून मी पुन्हा येईल, असा नारा दिला जात असला तरी याला किती प्रतिसाद मतदार देता की सत्ता बदल करतात हे निकालामधूनच पाहायला मिळणार आहे.

Gram Panchayat Elections
Gram Panchayat Election : माळशिरसमध्ये गाजणार निवडणुका

निवडणुकीत सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने उर्वरित सदस्यांना एकत्र करण्यासाठी उपसरपंचपदासाठी रस्सीखेच होताना दिसत आहे. सरपंच थेट मतदानातून निवडले जाणार असल्याने उपसरपंचपदालाही महत्त्व आले आहे. आपल्या समर्थकांचे अधिक अर्ज भरून ते निवडून आणण्यासाठी आतापासून फिल्डिंग लावली गेली आहे.

अठरा डिसेंबर रोजी होणार मतदान

जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. २०) जाहीर होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे झेडपी, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com