
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी चांगलीच रंगली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (ता.२) अंतिम दिवस होता. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने सरपंचपदासाठी (Sarapanch Election) १०६८, तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५८७९ अर्ज दाखले झाले आहेत. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाले असले तरी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमधील ६४६ प्रभागासाठी ही निवडणूक प्रक्रिया असणार आहे. दाखल अर्जांची छाननी सोमवारी (ता. ५) सकाळी ११ पासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारी (ता. ७) दुपारी तीनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवारीच दुपारी तीन वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल २० डिसेंबरला जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे.
तालुका ग्रामपंचायती सरपंचासाठी अर्ज सदस्यांसाठी अर्ज
करमाळा ३० १३५ ६२५
माढा ८ ३६ ३१२
बार्शी २२ ११० ४८२
उत्तर सोलापूर १२ ७८ ४७०
मोहोळ १० ५७ २८५
पंढरपूर ११ ६१ ४२३
माळशिरस ३५ १९८ १३०२
सांगोला ६ ४५ २६५
मंगळवेढा १८ ११८ ६२६
दक्षिण सोलापूर १७ १२१ ६३७
अक्कलकोट २० १०९ ४५२
एकूण १८९ १०६८ ५८७९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.