राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ११ अर्ज दाखल

१८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवार २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ११ अर्ज दाखल
President ElectionAgrowon

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) बुधवारी (ता. १५) पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी (Nomination) अर्ज दाखल केले. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) नावाच्या व्यक्तीचाही नामांकन करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

१८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवार २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील सारण येथील लालू प्रसाद यादव नावाच्या व्यक्तीचाही नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. त्याचवेळी एका उमेदवाराचा नामनिर्देशन नाकारण्यात आला. कारण त्या व्यक्तीने संसदीय मतदारसंघासाठी सध्याच्या मतदारयादीत आपले नाव दर्शविणाऱ्या कागदाची प्रमाणित प्रत जोडली नव्हती.

बुधवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार हे दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील होते. १८ जुलै रोजी देशाच्या नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये ४ हजार ८०९ मतदान होणार आहे. आवश्यकता भासल्यास २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत २९ जूनपर्यंत आहे. ३० जूनपर्यंत छाननी केली जाईल आणि उमेदवार २ जुलैपर्यंत अर्ज परत घेऊ शकतील.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. नवीन राष्ट्रपतींना २५ जुलैपर्यंत शपथ घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत २४ जुलैपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड होणे गरजेचे होते. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताना याची काळजी घेतली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com