Rain Update : जळगावमधील ११ प्रकल्प १०० टक्के भरले

जळगाव जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. इतर दोन प्रकल्पदेखील ९० टक्क्यांवर भरले असून, सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामही चांगला येणार असल्याची चिन्हे आहेत.
Irrigation
IrrigationAgrowon

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्प (Jalgaon Irrigation Project) १०० टक्के भरले आहेत. इतर दोन प्रकल्पदेखील ९० टक्क्यांवर भरले असून, सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा (Water Storage) असल्याने रब्बी हंगामही (Rabi Season) चांगला येणार असल्याची चिन्हे आहेत.

जळगाव जिल्ह्यात यंदा १०७ टक्के पाऊस झाला आहे. हतनूर धरण ९८, वाघूर ९१, तर गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाई मिटली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ५९१.४ मिलिमीटर म्हणजे १०७.३ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील भोकरबारी प्रकल्प वगळता तीन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघू प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पात सरासरी ९४.२९ टक्के उपयुक्त साठा आहे. त्यामुळे सिंचनासह पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटला आहे.

Irrigation
Irrigation Scam : सिंदखेडराजातील सूक्ष्म सिंचन अनुदान घोटाळ्यात तिघांचे निलंबन

खानदेशात यंदा जूनमध्ये ९, १० जूनला पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने ओढ दिली. जुलैत चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली. १५ ऑगस्टनंतर चांगला पाऊस झाला. सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस झाला. यामुळे गिरणा धरण शंभर टकके भरले, तर जिल्ह्यातील मोठी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. लहान धरणेही ओव्हर फ्लो आहेत. धुळ्यातील पांझरा, सोनवद, अमरावती, बुराई या प्रकल्पांतही १०० टक्के जलसाठा आहे.

जळगावमधील वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नाही. असे असले तरी लहान-मोठे नदीनाले पाणलोट क्षेत्रातून वाघूर प्रकल्पात बऱ्यापैकी आवक झाली. सद्यःस्थितीत वाघूर प्रकल्पात ९१ टक्के उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षी अजिंठा डोंगर परिसरात दमदार पावसामुळे वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार आवक होऊन वाघूर प्रकल्प २० सप्टेंबरपूर्वीच ओव्हरफ्लो झाला होता.

Irrigation
Irrigation : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार कोटी

हतनूर प्रकल्पाच्या पूरनियंत्रण आराखड्यानुसार प्रकल्पात १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान १०० टक्के साठा केला जातो. या वर्षीदेखील १ ऑक्टोबरला ९७ टक्के साठा असून, साठा नियोजनानुसार येत्या आठ दिवसांत तो १०० टक्के होईल. यामुळे हतनूर प्रकल्पावर अवलंबून असलेली ११० गावे तसेच शहरे, प्रकल्प व औद्योगिक वसाहतींच्या मागणीनुसार वर्षभर पाणीपुरवठा केला जाईल. हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सद्यःस्थितीत २१.११ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

गिरणा प्रकल्पाचे चार दरवाजे ३० मीटरने उघडून चार हजार ९५२, तर हतनूरचे चार दरवाजे अनुक्रमे एक व अर्धा मीटरने उघडून आठ हजार ८२९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. या धरणामुळे २१ हजार हेक्टरवरील रब्बीचे सिंचन करणे शक्य होईल. वाघूरमुळे जळगाव, भुसावळ, जामनेरात पाटाद्वारे पिकांना पाणी दिले जाईल.

जळगाव जिल्ह्यातील धरणांतील साठा

धरणाचे नाव जलसाठ्याची टक्केवारी

हतनूर ९८.९०

गिरणा १००

वाघूर ९०.९१

अभोरा १००

मंगरूळ १००

सुकी १००

मोर ९९.०३

अग्नावती १००

हिवरा १००

बहुळा १००

तोंडापूर १००

अंजनी १००

गूळ ८७.८७

भोकरबारी ४६.१९

बोरी १००

मन्याड १००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com