व्याजापोटी वीजग्राहकांना ११५ कोटींचा परतावा

याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारित करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते
Refund
RefundAgrowon

कोल्हापूर : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ८० लाख ४१ हजार १८९ ग्राहकांना ११४ कोटी ६६ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. यामध्ये मे महिन्याच्या वीजबिलांमध्ये ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे तर जून महिन्याच्या बिलामध्ये उर्वरित २२ कोटी ३ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारित करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमे इतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.

असा मिळाला लाभ...

जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी पुणे जिल्ह्यातील ३९ लाख २ हजार २६ वीजग्राहकांना ७१ कोटी १३ लाख, कोल्हापूर जिल्हा- ११ लाख ८६ हजार ७२४ वीजग्राहकांना १४ कोटी ६८ लाख, सांगली जिल्हा- ९ लाख ७ हजार ६१० वीजग्राहकांना ८ कोटी ३० लाख, सातारा जिल्हा- ९ लाख ९१ हजार ९९१ वीजग्राहकांना ९ कोटी ९१ लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ८३८ वीजग्राहकांना १० कोटी ६४ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com