Heavy Rain : ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी हवेत ११९ कोटी

या वर्षात जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाने कहर केला होता. या नुकसानाची भरपाईसाठी तब्बल ११९ कोटी रुपयांची आवश्‍यकता लागणार आहे.
Heavy Rains
Heavy RainsAgrowon

अकोला ः या वर्षात जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाने (Heavy Rains) कहर केला होता. या नुकसानाची भरपाईसाठी तब्बल ११९ कोटी रुपयांची आवश्‍यकता लागणार आहे. या पावसामुळे १ लाख २९ हजार ५२ शेतकऱ्यांना बसलेला असून, १ लाख ८० हजार ६७१ हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळ पिकांचे नुकसान झाले होते. याबाबतचा संयुक्त अहवाल तयार करण्यात आला असून, तो शासनाकडे पाठवण्यातआला आहे.

Heavy Rains
Crop Insurance : पीकविम्याचे १२०० कोटी लवकरच मिळणार

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. सलग आठ दिवस पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांची वाट लागली. हे अतोनात नुकसान पाहता नुकसानग्रस्त पिकाना भरपाईची मागणी होऊ लागली.

याचा विचार करता शासनाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली व तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. त्यासोबतच लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांत नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात आले असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. त्यासोबत नुकसानीचा अहवाल शासनाकडे सुपूर्द सुद्धा करण्यात आला आहे. पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर व इतर जिरायती पिकांचे नुकसान झाले होते. सोबतच पपई, केळी, लिंबू, संत्रा व इतर फळपिकेही अतिवृष्टीमुळे बाधित झाली.

Heavy Rains
Crop Insurance : पीकविम्याचे १२०० कोटी लवकरच मिळणार

यंदाही नुकसानीचा फटका

जून, जुलै महिन्यांत शेतकऱ्यांचे १२३ कोटी ६२ लाख, तर ऑगस्टमध्ये १० कोटी ४१ लाखांचे, अर्थात दोन महिन्यांत १३४ कोटी ४० लाख ४१ हजार ८६४ रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे ४२७ गावातील एक लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांचे ८३ हजार १३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी ११३ कोटी ६१ लाख ७०४ रुपयांच्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आता ऑक्टोबरमधील मदतीची भर पडली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com