गुळुंचवाडीत वीज पडून १२ शेळ्यांचा मृत्यू

मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी; शेतकऱ्याचे नुकसान
गुळुंचवाडीत वीज पडून १२ शेळ्यांचा मृत्यू
MonsoonAgrowon

आळेफाटा, जि. पुणे ः मॉन्सूनपूर्व पावसात (Pre-Monsoon Rain) गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील ठाकर वस्तीवर बुधवारी (ता. १) वीज पडून १२ शेळ्यांचा (Goat Killed) मृत्यू झाला. शेतकरी धोंडिबा कोतवाल सकाळी दहा वाजता शेळ्या चारण्यासाठी आणे शिवारात गेले होते. या वेळी झालेल्या पावसात वीज (Lightning) पडल्याने शेळ्यांचा मृत्यू झाला.

दुपारी तीननंतर अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला. नेमकी त्याच झाडावर वीज पडली. त्यात धोंडिबा कोतवाल यांच्या आठ आणि शिवाजी कोतवाल यांच्या चार अशा एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. धोंडिबा कोतवाल यांच्या पत्नी कमल कोतवाल शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसल्या होत्या. त्यांनाही विजेच्या झटका बसला. कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या संकटामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना झाली. सुमारे अर्धतास झालेल्या या जोरदार पावसामुळे रस्त्याच्या कडेला व शेतामध्ये पाणी साठले होते. आळेफाटा, राजुरी, तसेच आणे पठार व इतर गावांत देखील जोरदार पाऊस झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com