आसाममध्ये पुरामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीरच असून पुरामुळे गेल्या २४ तासांत आणखी १२ जणांचा मृत्यू झाला.
आसाममध्ये पुरामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू
Assam FloodAgrowon

गुवाहाटी (वृत्तसंस्था) ः आसाममध्ये पूरस्थिती (Assam Flood) अद्याप गंभीरच असून पुरामुळे गेल्या २४ तासांत आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात ५४.५ लाख जणांना पुराचा फटका (Assam Flood Affected) बसला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून सुरु असलेल्या पुराच्या थैमानात आतापर्यंत १०१ जणांचे बळी गेले आहेत. आसाममधील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून ब्रम्हपुत्रा (Brahmaputra River), बराक आदी नद्यांना अजूनही पूर असून राज्यातील काही भागांत मात्र पूर ओसरत आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएने आतापर्यंत २७६ नौकांच्या मदतीने ३,६५८ जणांची सुखरूप सुटका केली आहे. एनडीआरएफ पूरग्रस्त १२ जिल्ह्यांत ७० नौका आणि ४०० जवानांच्या मदतीने बचावकार्य राबवीत आहे. त्याचप्रमाणे, मंगळवारी सिल्चरला एनडीआरफची २०७ जवानांची आणखी एक तुकडी रवाना केल्याची माहिती संतोषकुमार सिंह यांनी दिली. आसाममधील कामरूप, बारपेटा, होजाई, नलबारी, दरांग, तामूलपूर कच्चर आदी जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफकडून मदत व बचावकार्य राबविले जात आहे. बराक नदीच्या खोऱ्यातील कच्चर, करीमगंज, हैलाकंडी आदी जिल्ह्यांना बराक आणि कुशियारा नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. बंधारा फुटल्याने सिल्चर शहर गेल्या चार दिवसांपासून पाण्यात बुडाले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा सिल्चरचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पुराची सद्य:स्थिती

फटका बसलेले नागरिक - ५४ लाख

एकूण मृत्यू - १०१

प्रभावी गावे - पाच हजार

पिकांचे नुकसान - एक लाख हेक्टर

राहुल, प्रियांकांचे मदतीचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. ‘आसाममध्ये पुरात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटंबींयाप्रति संवेदना व्यक्त करतो. काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आसाममध्ये बचावकार्य सुरू ठेवावे’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. प्रियांका गांधी यांनीही हिंदीतून ट्विट करत काँग्रेस कार्यकर्त्यांना आसाममधील नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यचे आवाहन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com