Nashik Bus Fire : बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल सिग्नलवर खासगी प्रवासी वाहतूक बस व १६ टायर ट्रकचा शनिवारी (ता. ८) पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी भीषण अपघात झाला.
Bus Accident
Bus AccidentAgrowon

नाशिक : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील (Nashik-Aurangabad Highway) मिरची हॉटेल सिग्नलवर खासगी प्रवासी वाहतूक बस व १६ टायर ट्रकचा शनिवारी (ता. ८) पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी भीषण अपघात झाला. यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्या खासगी कंपनीच्या बसला (Private Travels) अपघातानंतर आग लागली.

Bus Accident
Lumpy Skin : ‘लम्पी’ आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करा

त्यात तब्बल १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासनाने दिलेला माहितीनुसार, ३१ जणांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात, तर ८ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bus Accident
Lumpy Skin : परभणी जिल्ह्यात म्हशींच्या वाहतुकीस अटींसह परवानगी

भीषण अपघातात आग लागल्याने काही प्रवाशांनी बस मधून उड्या मारून आपला जीव वाचवला. मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सिटी बसमधून मृतदेह नेण्याची वेळ ओढवली. मिरची हॉटेल परिसरातील सिग्नल हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे.

यापूर्वी येथे शेतीमालाने भरलेल्या वाहनांचे अनेकदा अपघात झाले आहेत. या शिवाय कोंबड्या वाहून येणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने मोठा प्रमाणावर कोंबड्या मृत पावल्या होत्या. तर विद्यार्थ्यांच्या बसलाही अपघात झाले आहेत.

घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तीव्र दुःख व्यक्त करत मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना प्रकट केली. तसेच मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. या वेळी पालकमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, देवयानी फरांदे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com