Electricity : वीज समस्या सोडवण्यासाठी १२० कोटींचा आराखडा

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांची विजेची होत असलेली समस्या लक्षात घेऊन नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात यावे व सध्याच्या उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
Electricity
Electricity Agrowon

नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांची विजेची (Electricity Issue In Karjat Jamkhed) होत असलेली समस्या लक्षात घेऊन नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात यावे व सध्याच्या उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात यावी, यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही तालुक्यांतील वीज समस्या सोडवण्यासाठी १२० कोटींच्या आराखड्याला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव, भांबोरा, खांडवी, कुळधरण, भाणगाव येथील असलेल्या उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यालाही शासनाने मंजुरी दिली आहे. वीज वितरण हानी कमी करण्यासाठी ५३.७६ कोटी तर वीज वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी ६६.७६ कोटी रुपये अशा एकूण १२०.४८ कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून विजेबद्दलची विविध कामे मार्गी लावली आहेतच.

Electricity
Electricity : वीज ग्राहकांवरील बोजा रद्द करा ः प्रताप होगाडे

शिवाय शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी सहा कोटींपेक्षा अधिक आमदार निधीदेखील वापरला आहे. मतदारसंघातील विजेची असलेली सर्व अडचण दूर करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याचेच फलितरूप म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विजेची समस्या दूर होण्यास मदत होत आहे. नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाल्याने व पूर्वीच्या उपकेंद्राची क्षमता वाढवल्याने वीजपुरवठा होत असताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यास मदत होणार आहे.

Electricity
Electricity : वीज देयके वसुलीसाठी साखर कारखान्यांवर नाही सक्ती

मतदारसंघात काही ठिकाणी सोलार प्रकल्पदेखील उभारण्यात आले असून वीजपुरवठा अखंडित व्हावा व सातत्य असावे यासाठी विविध ठिकाणी नवीन लिंक लाइनचे काम, नवीन विद्युत रोहित्र बसवणे, शेतातील नादुरुस्त झालेले रोहित्र त्वरित बदलून देणे अथवा दुरुस्त करून देणे यासह विजेच्या संदर्भातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमदार पवार यांच्या माध्यमातून होत आहे.

या योजनेच्या अंतर्गत कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यांत आपण सर्वेक्षण करून घेतले व आराखडा बनवला. हा आराखडा सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून मंजूर करून घेतला आहे. यामुळे वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com