Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

Sugarcane Crushing Season : पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांचे १२५ लाख ४३ हजार टन गाळप

पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी १२५ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केले असून, १२४ लाख ६३ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे.

Sugarcane Crushing Season सोमेश्वरनगर ः पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी १२५ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) केले असून, १२४ लाख ६३ हजार क्विंटल साखरनिर्मिती (Sugar Production) केली आहे. सोमेश्वर कारखान्याने ११.६३ टक्के साखर उतारा मिळवत सलग सातव्या वर्षी प्रथम स्थान पटकावले आहे.

जिल्ह्याचा साखर उतारा मात्र दहा टक्क्यांच्या आतच अडकला असून मागील हंगामाच्या तुलनेत तो पाऊण टक्क्यांनी घटला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.

मागील वर्षी १५४ लाख टन उसाचे गाळप करत १०.६७ टक्के सरासरी साखर उतारा राखून १६४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली होती.

Sugarcane Season
Sugarcane Season : गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५२ कारखाने लवकर बंद

हंगाम एप्रिल-मेपर्यंत लांबला होता. चालू हंगामात ११ सहकारी व ६ खासगी कारखान्यांनी हंगाम घेतला. ऊस टंचाईमुळे हंगाम महिनाभर आधीच बंद होणार आहे. साखर आयुक्तालयाच्या २३ मार्चच्या अहवालानुसार कर्मयोगी (१७ फेब्रु), राजगड (२५ फेब्रु), अनुराज (२७ फेब्रु.) हे कारखाने बंद झाले.

मार्चमध्ये घोडगंगा (६ मार्च), भीमा-पाटस (१४ मार्च), श्रीनाथ म्हस्कोबा (१५ मार्च), छत्रपती व बारामती अॅग्रो (१८ मार्च) रोजी बंद झाले. सोमेश्वर व माळेगावचा हंगामही मार्चमध्येच संपणार आहे. बारामती अॅग्रोने १६ लाख ४३ हजार टन इतके जिल्ह्यात सर्वोच्च गाळप केले आहे.

पाठोपाठ सोमेश्वर व माळेगावनेही बारा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तीन वर्षांनंतर सुरू झालेल्या भीमा-पाटसने तीन २ लाख ९४ हजार टनांचे गाळप करून पुनश्च हरिओम केले. मात्र राजगड कारखाना या सर्वच बाबतीत अपयशी ठरला आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : सहा साखर कारखान्यांची धुराडी बंद

कारखाना एकूण गाळप (टन) साखरनिर्मिती (क्विंटल) सरासरी उतारा (टक्के)

सोमेश्वर ः १२३५५६३ १४३६७५० ११.६३

माळेगाव ः १२३३२३० १२८८१०० १०.४४

छत्रपती ः ८९५०६९ ९४७८०० १०.५९

भीमा पाटस ः २९४७५५ २६९२२५ ९.१३

विघ्नहर ः ८७८८१० ९५९९०० १०.९२

कर्मयोगी ः ७१७९५१ ५०६२५० ७.०५

राजगड ः ५२५५१ ३९२५० ७.४७

संत तुकाराम ः ४८१७१५ ५४७८०० ११.३७

घोडगंगा ः ४३८३३४ ४५०१०० १०.२७

भीमाशंकर ः ९०८३१० १०४४२०० ११.५०

नीरा भीमा ः ५६४६८२ २९४३५० ६.९८

श्रीनाथ म्हस्कोबा ः ६३०८११ ५४०७२५ ८.५७

अनुराज ः ३२५७३१ ३३८१५० १०.३८

दौंड शुगर ः ९८७८५० ९९७९४३ १०.१०

बारामती अॅग्रो ः १६४३९०७ १४४७२०० ८.८०

व्यंकटेशकृपा ः ६२७८४० ६९५१०० ११.०७

पराग अॅग्रो ः ६२६००० ५६०२२५ ८.९५

सहकारी कारखाने सरस

साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखाना (११.६३ टक्के) अग्रभागी असून भीमाशंकर (११.५० टक्के), संत तुकाराम (११.३७ टक्के), व्यंकटेशकृपा (११.०७ टक्के) यांना चांगला उतारा मिळाला आहे. इथेनॉलनिर्मितीमुळे काहींचा उतारा घसरला असला तरीही नीरा भीमा, कर्मयोगी, राजगड यांचा उतारा अत्यंत चिंताजनक आहे.

सरसरीमध्ये सहकारी कारखान्यांना १०.२४ टक्के, तर खासगी कारखान्यांना अवघा ९.४६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. परिणामी एफआरपीत सहकारी कारखाने सरस ठरणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com