Summer Sowing : पुणे विभागात १२६ टक्के उन्हाळ पेरण्या

उन्हाळ हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
Summer Sowing
Summer Sowing Agrowon

Pune Agriculture News : उन्हाळ हंगामातील पिकांच्या पेरण्या (Summer Sowing) पूर्ण झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्र २७ हजार ६२५ हेक्टरपैकी ३४ हजार ७४० हेक्टरवर म्हणजेच १२६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भूईमूग या पिकांच्या समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चारा टंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांच्या पेरणीकडे वळू लागले आहेत. परिणामी विभागात उन्हाळ पिकांच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी काही भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते.

Summer Sowing
Summer Bajari Sowing : सांगोल्यात शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीकडे कल

त्यामुळे रब्बीच्या पेरण्या उशिराने झाल्या होत्या. सध्या पुणे विभागात पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ पेरण्यांवर भर दिला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते. विभागात उन्हाळ मक्याची १६ हजार २३३, बाजरी ६४२०, उन्हाळ मूग ७४, उडीद ७५, भुईमूग १० हजार ३९७, सोयाबीनची ११ हजार ९१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Summer Sowing
Summer Season Sowing : सांगली उन्हाळ हंगामाचा १ हजार ९०० हेक्टरवर पेरा

सध्या विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकांची काढणी अंतिम टप्यात आली आहे. जिल्ह्यात उन्हाळ हंगामातील उन्हाळ मका व भुईमूग पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पेरणी झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू पिकांची काढणी पूर्ण होत आली आहे.

जिल्ह्यात हंगामातील उन्हाळ बाजरी व भुईमूग पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी बाजरी, भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात भोर, बारामती या तालुक्यांत पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी पूर्ण होत आली आहे.

जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अक्ककोट, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यांत बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत.

जिल्हानिहाय झालेली पेरण्या ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्के

नगर --- ८८८६ --- ९०६९ --- १०२

पुणे --- ११०९४ --- १३,०१५ --- ११७

सोलापूर --- ७६४५ --- १२६५६ -- १६६

एकूण --- २७,६२५ --- ३४७४० --- १२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com