
नगर ः जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल सात हजार ९४ जणांनी सदस्यत्त्वपदासाठी अर्ज दाखल केले.
सरपंच पदासाठी एक हजार २८२ लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी (ता.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. गावागावांतील चित्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या होत आहेत. विशेषतः युवा वर्गातून अधिक अर्ज भरल्याचे दिसून येत आहे. प्रारंभी सर्व अर्ज ऑनलाइन भरण्याच्या प्रशासनाच्या सूचना होत्या.
तथापि, त्यातील अडचणींमुळे ऑफलाइन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली. त्यानुसार शनिवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासन आकडेवारीची जुळवाजुळव करीत होते. सरपंच पदाची यावेळी थेट लोकांतून निवड होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.