Kharif Sowing : पावसामुळे खरिपाच्या १३ टक्के पेरण्या

पावसाचा जवळपास एक महिना संपला आहे. या कालावधीत पुरेसा पाऊस न पडल्याचा परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

पुणे ः पावसाचा (Rain) जवळपास एक महिना संपला आहे. या कालावधीत पुरेसा पाऊस (Insufficient Rain) न पडल्याचा परिणाम खरिपाच्या पेरणीवर (Kharif Sowing) झाला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या एक लाख ८४ हजार २७४ हेक्टरपैकी २४ हजार ६०५ हेक्टर म्हणजेच १३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पश्‍चिमेकडील पट्ट्यात भात रोपवाटिकेतील रोपे (Paddy Seedling) उगवणीच्या अवस्थेत असून, पूर्व भागात बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन (Soybean) या पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.

Kharif Sowing
Kharip Sowing: राज्यभरात फक्त १३ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवघ्या १४ हजार ३१९ हेक्टर म्हणजेच सरासरी ७ टक्के पेरणी झाल्या होत्या. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून काही प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने पेरण्यांना चांगलीच सुरुवात झाली आहे. भातपट्ट्यात अनेक शेतकऱ्यांनी ‘एसआरटी’ पद्धतीने भात लागवडी केल्या आहेत. तर, काही शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी रोपवाटिका तयार केल्या आहेत. सध्या रोपांची उगवण होत असली तरी अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे रोपांची अवस्था चांगली आहे. अशीच स्थिती आगामी काळात राहिल्यास दहा ते पंधरा दिवसांत रोपांच्या लागवडी सुरू होण्याची शक्यता आहे.

Kharif Sowing
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खरिपाची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाण्यांची खरेदी केली होती. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती वगळता उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही. दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पावसाचा चांगलाच खंड पडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर होऊ शकल्या नाही. आता पाऊस पडण्यास सुरुवात झाली असली तरी पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, खेड भागांत सुरुवातीला झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पेरण्या झाल्या असल्या तरी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत बऱ्यापैकी खरिपाच्या पेरण्या झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी याच काळात ८० हजार हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पेरणीच्या क्षेत्रात चांगलीच घट झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात पीकनिहाय झालेली पेरणी, क्षेत्र -हेक्टरमध्ये :

पीक --- सरासरी -- झालेली पेरणी

भात -- ५७,९६४ -- १४५

ज्वारी -- ८०६ -- २

बाजरी -- ३८,७६१ -- ६२३१

रागी -- ३२४२ -- ०

मका -- १७१३५ -- ४६९८

इतर तृणधान्ये -- १०४७ -- २१

तूर --- १९२० -- २१

मूग -- १३,८०४ -- ३८०८

उडीद -- १५५७ -- १५३

इतर कडधान्ये -- ९६५४ -- ३८६

भुईमूग -- १६०९० -- ७९३

तीळ --- ३१२ -- ०

कारळे -- ३८३५ -- ५६

सूर्यफूल -- ३५३ -- ०

सोयाबीन -- १७,४८२ -- ७९९०

इतर गळीतधान्य -- २९६ -- १६६

कापूस -- १७ -- ९८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com