Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे १३० कोटी वितरित

अकोला ः जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जून, जुलै या दोन महिन्यांत ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

अकोला ः जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) व सततच्या पावसामुळे जून, जुलै या दोन महिन्यांत ९० हजार ६६५ तर ऑगस्टमध्ये सात हजार ६५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले होते. या नुकसानीसाठी जिल्ह्याला १३० कोटींचा निधी (Crop Damage Compensation) मिळाला तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे. सर्वाधिक मदत बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : अतिवृष्टी होऊनही पंचनाम्यांकडे काणाडोळा

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात जून ते ऑगस्टदरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टीमुळे शेती, पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागातील शेतीतील पिके खरडूनसुद्धा गेले. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने युद्धपातळीवर पंचनामे केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या निकषानुसार सुधारित शासन निर्णय जारी केला.

त्यामुळे पुन्हा सुधारित संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला. यामध्ये जून ते जुलै दरम्यान ९० हजार ६६५ हेक्टरवर, तर ऑगस्टमध्ये ७ हजार ६५६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, एका लाखाच्या वर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांसाठी जून ते जुलै चा १२३ कोटी ६२ लाख ८८ हजार ९८४ रुपये व ऑगस्टमधील नुकसान भरपाईसाठी १० कोटी ४१ लाख २९ हजार ८० रुपयांच्या निधीची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार १३० कोटी ९ लाख ५३ हजार नुकसानभरपाई प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना सरसकट मदत द्या

...असे आहे मदतीचे स्वरूप

जिरायती क्षेत्र ः पावसामुळे जिल्ह्यातील १ लाख चार हजार ५६३ शेतकऱ्यांचे ९ हजार ४७९.९४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना १२३ कोटी ५ लाख २७ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.

Crop Damage
Crop Damage : तीन दिवसांपासून पाऊस; सोयाबीनमध्ये तळे

आश्‍वासित सिंचनाखालील क्षेत्र ः या क्षेत्रातील १३० शेतकऱ्यांचे १०१.२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २७ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे.

बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्र : पावसामुळे १९५ शेतकऱ्यांचे ८४ कोटी १५ लाख रुपयांचे बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी ३० लाख २९ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत.

तालुकानिहाय मदत

अकोला ४९ कोटी ३१ लाख ५३ हजार

बार्शीटाकळी २९लाख २४ हजार

अकोट १९ कोटी ७५लाख २४ हजार

तेल्हारा ३ कोटी २३ लाख ७२ हजार

बाळापूर ५३ कोटी ८८ लाख २१ हजार

मूर्तिजापूर ३ कोटी ६१ लाख ५९ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com