धरणांत चोवीस तासांत १३.२६ टीएमसी पाणीसाठा

धरणक्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, जिल्ह्यातील २६ धरणांतील आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर (Rain Force In Dam Area) चांगलाच वाढला असून, जिल्ह्यातील २६ धरणांतील आवकेत वाढ (Water Inflow In Dam) होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत धरणांत नव्याने १३.२६ टीएमसी एवढी आवक झाली आहे. त्यामुळे आता धरणांत ६१.३८ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा (Water Stock) झाला आहे. खडकवासला (Khadkwasala), कळमोडी ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

Rain Update
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

गेल्या पंधरा दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाल्याने मागील काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने शेते भरून वाहत आहेत. त्यातच घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय लोणावळा घाटमाथा, वळवण, ठोकरवाडी, मुळशी या घाटमाथ्यावरही पाऊस पडला.

Rain Update
Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोर अधिक आहे. या क्षेत्रात १४९ मिलिमीटर पाऊस पडला. तर वडिवळे १०२ मिलिमीटर, पानशेत ९३, वरसगाव ८८, गुंजवणी ७४, नीरा देवघर ७१, माणिकडोह ६०, भाटघर ५३, माणिकडोह ४५, डिंभे ४१, आंध्रा ४३, कळमोडी ५६, भामा आसखेड ३८, कासारसाई ४८, खडकवासला ३८ मिलिमीटर पाऊस पडला. तर शेटफळ, नाझरे, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर आणि उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. मात्र, पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू लागला आहे.

धवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत झालेली पाण्याची आवक, टीएमसीमध्ये :

टेमघर ०.२१, वरसगाव ०.६५, पानशेत ०.५५, खडकवासला १.०३, पवना ०.४८, कासारसाई ०.१३, कळमोडी ०.३९, चासकमान ०.६२, भामा आसखेड ०.३९, वडिवळे ०.१६, शेटफळ ०.०१, गुंजवणी ०.२७, भाटघर १.३०, नीरा देवघर ०.५२, वीर १.१२, पिंपळगाव जोगे ०.५६, माणिकडोह ०.८४, येडगाव ०.३१, डिंभे ०.५७, चिल्हेवाडी ०.१७, घोड ०.०४, विसापूर ०.०९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com