Assam Flood : आसाममध्ये १३४ पूरबळी

आसाममधील पूरस्थितीमध्ये आज आणखी सुधारणा झाली. राज्यातील बहुतेक नद्यांच्या पाणीपातळीत होणारी घट कायम आहे.
Assam Flood
Assam FloodAgrowon

गुवाहाटी (वृत्तसंस्था) ः आसाममधील पूरस्थितीमध्ये (Assam Flood) आज आणखी सुधारणा झाली. राज्यातील बहुतेक नद्यांच्या पाणीपातळीत होणारी घट कायम आहे. पूरग्रस्तांची (Flood Affected) संख्याही कमी होऊन २१ लाखांवर आली. कच्चर जिल्ह्यातील सिल्चर शहरातील बहुतेक भाग मात्र आठवड्यानंतरही पाण्याखाली आहे. गेल्या २४ तासांत पुरामुळे आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. एकजण बेपत्ता झाला. त्यामुळे, पूरबळींची संख्या १३४ वर गेली आहे. (Latest Flood Update Assam)

Assam Flood
मूग, उडदाची लागवड का घटतेय?

राज्यातील कोपिली आणि बराक या दोन नद्या वगळता इतर बहुतेक नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. कोपिली आणि बराक या नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंत्री रणजीतकुमार दास यांच्यासह बाजाली जिल्ह्यातील कुवारा येथे फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. त्यांनी यावेळी पूरग्रस्तांशीही संवाद साधत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून पूरस्थितीबद्दल माहिती दिली. पुराचा मोठा फटका बसलेले सिल्चर शहर आठवड्यापासून पाण्यात आहे. तिथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अद्याप सुरू आहे.

सिल्चरमधील रेल्वे स्थानकासह इतर ठिकाणी झालेल्या हानीचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, प्रशासनाकडून शहरातील कचरा स्वच्छ करण्यात येत आहे. मात्र, नागरिक घर व दुकाने स्वच्छ करून कचरा पुन्हा रस्त्यांवर टाकत असल्याने अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे, प्रशासनाने कचरा रस्त्यांवर न टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

मदत छावण्यांत दोन लाख नागरिक

राज्याचे मुख्य सचिव जिष्णू बारूआ यांनी बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांच्या उपायुक्तांबरोबर आभासी बैठक घेऊन मदतकार्याच्या सूचना दिल्या. आसाममधील २,२५४ गावे अद्याप पुराच्या पाण्यात असून ५३८ मदत छावण्यांत दोन लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे. बारपेटा, बोंगाईगाव, चिरांग, मोरीगाव, नालबारी आदी जिल्ह्यांत मातीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com