Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे १४ जनावरे दगावली

परभणी जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’मुळे बाधित जनावरांची संख्या संथगतीने वाढत आहे. बुधवार (ता. १९) पर्यंत जिल्ह्यातील नऊपैकी आठ तालुक्यांतील ६७ गावांतील ४२३ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ मुळे (Lumpy Skin Disease) बाधित जनावरांची संख्या संथगतीने वाढत आहे. बुधवार (ता. १९) पर्यंत जिल्ह्यातील नऊपैकी आठ तालुक्यांतील ६७ गावांतील ४२३ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. उपचारानंतर १७७ जनावरे बरी झाली आहेत. एकूण १४ जनावरे दगावली आहेत.

सध्या जिल्ह्यात लम्पी बाधित २३३ सक्रिय जनावरे आहेत. जनावरे दगावलेल्या आठ पशुपालकांना १ लाख ६९ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. आजवर २ लाख ८७ हजार ९२७ जनावरांचे लसीकरण (Lumpy Skin Vaccination) पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे (Dr. P. P. Nemade) यांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Skin : 'सर्व जनावरांची लसीकरण पूर्ण करणार'

परभणी जिल्ह्यातील नऊपैकी सोनपेठ वगळता इतर सर्व आठ तालुक्यांतील ६७ गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव झाला आहे. एकूण ४२३ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. सध्या सक्रिय असलेल्यांपैकी १७ जनावरे गंभीर आहेत. बाधित गावांपासून ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ३१० आहे. या गावांमध्ये गायींची संख्या ५१ हजार ९८, बैलांची संख्या ५७ हजार ४३४ आणि म्हशीची संख्या ३९ हजार ११३ एवढी आहे. या आजाराचा प्रसार टाळण्यासाठी १ लाख ५० हजार ७६८ गोवंशीय जनावरांचे लसीकरण तातडीने करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील लसीकरण करावयाच्या एकूण जनावरांची संख्या २ लाख ९९ हजार ८६१ एवढी आहे. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायी आणि १ लाख ६१ हजार ७११ बैल आहेत. आजवर २ लाख ९४ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या आहेत. इ पी सेंटर मधील १ लाख ४२ हजार ५६४ जनावरांचे लसीकरण झाले आहे. गोशाळेतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण झाले आहे. गोवर्गात स्वच्छ लसीकरण केलेल्या जनावरांची संख्या १ लाख ४१ हजार ३६८ आहे.

जिल्ह्यातील एकूण २ लाख ८७ हजार ९२७ जनावरांचे लसीकरण झाले आहे. त्यात गायींची संख्या १ लाख ३४ हजार २५२, बैलांची संख्या १ लाख ५० हजार ८५० आणि म्हशींची संख्या २ हजार ८२५ आहे. लम्पी स्कीनमुळे दगावलेल्या ३ बैलांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये नुसार ७५ हजार रुपये, १ गायी साठी प्रत्येकी ३० हजार रुपये, ४ वासरांसाठी १६ हजार रुपये नुसार ६४ हजार रुपये अशी एकूण १ लाख ६९ हजार रुपये अनुदान संबंधित पशुपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

सेलू तालुक्यात बैलांची जीभ तुटली...

शिराळा (ता. सेलू) येथील काही बैलांची जीभ तुटल्यामुळे तोंडातून रक्तस्राव झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) घडली. तुटलेल्या जिभेचे नमुने परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गुरुवारी (ता. २०) सकाळी पशुसंवर्धन विभागाचे पथक शिराळा येथे दाखल झाले.प्रयोगशाळेतील निदानानंतर या घटनेचे कारण स्पष्ट होईल, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com