
Agriculture Irrigation पुणे : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाचे (Ghod Dam) दोन स्वयंचलित दरवाजे तीन फुटांनी उचलून नदीपात्रात १ हजार ४१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग (Water Discharge) शनिवारी (ता. ११) सोडण्यात आल्याची माहिती कनिष्ठ शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.
चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून घोड नदीच्या पात्रात पाणी सोडल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. घोडनदीवर सांगवी (ता. श्रीगोंदा) पर्यंत पाच बंधारे बांधण्यात आलेले असून, शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक गावांतील हजारो एकर शेती याच बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. नदीवरून अनेक शेतकऱ्यांची
सिंचन व्यवस्थेसाठी याच पाण्याचा उपयोग केला जातो. परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हे सर्व बंधारे कोरडे ठणठणीत पडलेले होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत होती.
फेब्रुवारी अखेरीस हे सगळे बंधारे कोरडे पडल्याने शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी, इनामगाव, तांदळी आदी परिसरांत पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मागील आठवड्यात शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नदीपात्रात पाणी सोडण्याची आग्रही भूमिका घेतली होती.
नदीपात्रातील सगळेच बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाची भावना पाहायला मिळत आहे. सद्य:स्थितीत घोड धरणात ६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, धरणाच्या डाव्या कालव्यातून ४५०, तर उजव्या कालव्यातून १५० क्युसेकने कालव्यातून विसर्ग सुरू आहे. घोड धरणाखालील नदीपात्रातील पाच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या पाण्याने भरून घेण्यात येणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.