Rabi Crop Loan News : रब्बीसाठी १४४ कोटींवर पीककर्ज वितरित

परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात मंगळवार (ता. १५)पर्यंत एकूण १४ हजार ९७६ शेतकऱ्यांना १४४ कोटी ७३ लाख रुपये (२३.१६ टक्के) कर्जवाटप झाले आहे.
Crop Loan
Crop LoanAgriculture

परभणी ः परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) मंगळवार (ता. १५)पर्यंत एकूण १४ हजार ९७६ शेतकऱ्यांना १४४ कोटी ७३ लाख रुपये (२३.१६ टक्के) कर्जवाटप (Crop Loan) झाले आहे. आजवरच्या कर्जवाटपात १२ हजार ३४२ शेतकऱ्यांनी ११७ कोटी २० लाख रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे, तर एकूण २ हजार ६३४ शेतकऱ्यांना २७ कोटी ५३ रुपये एवढ्या रकमेचे नवीन कर्जवाटप करण्यात आले.

Crop Loan
Crop Loan : सोलापूर जिल्हा बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वितरणाचे ५९८ कोटींचे उद्दिष्ट

गत तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १७ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मंगळवार (ता. १५)पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १२ हजार १६७ शेतकऱ्यांना ११७ कोटी २४ लाख रुपये (३२.४१टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २ हजार ६६ शेतकऱ्यांना २० कोटी ७४ लाख रुपये (२३.८५ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४२८ शेतकऱ्यांना १ कोटी रुपये (१.४५ टक्के), खासगी बँकांनी ३१५ शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख रुपये (१०.४० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्हा बॅंकेकडून ३४६ कोटींचे कर्ज मंजूर

भारतीय स्टेट बँकेने पीककर्ज वाटपात आघाडीवर आहे. परंतु कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युको बँक या राष्ट्रीयीकृत बँका तसेच अॅक्सिस बँक या खासगी बँकेने पीककर्ज वाटप सुरू केल्याची माहिती नाही.

रब्बी हंगाम पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) १५ नोव्हेंबरपर्यंत

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम शेतकरी संख्या टक्केवारी

भारतीय स्टेट बँक २३१.५८ १११.२८ ११७१३ ४८.०५

महाराष्ट्र ग्रामीण बँक ८६.९५ २०७४ २०६६ २३.८५

जि.म.सहकारी बँक १२९.१८ १.८७ ४१८ १.४५

बँक ऑफ बडोदा २६.६९ २.६० १८७ ९.७४

बँक ऑफ इंडिया ४.८० ०.५१ ४२ १०.६३

बँक ऑफ महाराष्ट्रा ३२.७६ २.३८ १७६ ७.२६

इंडियन बँक ९.७८ ०.११ १५ १.१२

इंडियन ओव्हरसीज बँक ४.२१ ०.३१ २८ ७.३६

युनियन बँक ऑफ इंडिया १३.८५ ०.०५ ६ ०.३६

एचडीएफसी बँक १५.४७ ०.५६ २४ ३.६२

आयसीआयसी बँक १२.२४ ४.२५ २८२ ३४.७२

आयडीबीआय बँक १४.१६ ०.०७ ९ ०.४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com