Turmeric Cultivation : राज्यात हळदीची १५ टक्के लागवड

राज्यातील सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत हळद लागवड सुरू झाली आहे.
Turmeric Cultivation
Turmeric CultivationAgrowon

Maharashtra Turmeric Farming : राज्यातील सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत हळद लागवड सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे १५ टक्के हळदीची लागवड झाली असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली.

देशातील हळद लागवड क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात होते. त्यामुळे यंदाही राज्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सांगलीसह सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांत अक्षय तृतीयेला हळद लागवडीचा प्रारंभ केला जातो. त्यानुसार या चारही जिल्ह्यांत हळद लागवड सुरू झाली आहे.

परंतु, या भागांत वाढत्या तापमानाचा परिणाम हळद लागवडीवर होत असल्याने शेतकरी लागवडीसाठी थांबले आहेत. तापमान कमी झाल्यानंतर लागवडीस गती येईल.

Turmeric Cultivation
Turmeric Arrival : नांदेडमध्ये हळदीची एकाच दिवशी सर्वाधिक आवक

तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांतील शेतकऱ्यांनी हळद लागवडीची तयारी पूर्ण केली असली तरी, लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. या राज्यात अंदाजे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळद लागवड करण्यास प्रारंभ होईल.

देशात सध्या हळद लागवडीस गती नाही. परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून लागवडीस गती येईल. देशातील हळदीची लागवड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपेल अशी शक्यता आहे.

Turmeric Cultivation
Turmeric Cultivation : सांगलीत हळद लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता

विदर्भ, मराठवाड्यात मे मध्येच लागवड

विदर्भ, मराठवाडा या भागांत तापमान अधिक अससल्याने प्रामुख्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून हळद लागवड केली जाते. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे तापमानात घट होत असून हळद लागवड मे महिन्यातच होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या १५ टक्के हळद लागवड झाली आहे. हळद लागवडीसाठी तापमानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी लागवड करण्यास पुढाकार घ्यावा. सध्या हळद लागवडीस गती नसली तरी, येत्या काळात लागवडीची गती वाढेल.
- प्रभारी अधिकारी, हळद संशोधन, योजना कसबेडिग्रज, जि. सांगली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com